Parbhani News: परभणी जिल्ह्यात खरीप २०२५ मधील पीकविमा लागू असलेल्या ७ पिकांचे पेरणी क्षेत्र आणि विमा संरक्षित क्षेत्र यांच्यामध्ये १ लाख १३ हजारांवर हेक्टरचा फरक आहे.तर सोयाबीनचे पेरणी आणि विमा संरक्षित क्षेत्र यांच्यात ११ हजारांवर हेक्टरची तर मुगाची पेरणी आणि विमा संरक्षित क्षेत्र यांच्यात ५५२ हेक्टरची तफावत आहे. कपाशी, तूर, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांच्या पेरणीच्या तुलनेत विमा संरक्षित क्षेत्र कमी आहे..खरीप हंगाम २०२५ मधील अंतिम पेरणी क्षेत्रानुसार परभणी जिल्ह्यात ५ लाख १६ हजार ९२१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पंतप्रधान पीकविमा योजना लागू असलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या ७ पिकांचे जिल्ह्यातील यावर्षीचे पेरणी क्षेत्र ५ लाख १० हजार ५१४ हेक्टर आहे. .Crop Insurance : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ हजार शेतकऱ्यांचा खरीप पीकविमा योजनेत सहभाग.पीकविमा कंपनीने कृषी विभागाकडे सादर केलेल्या सोमवार (ता. १५) पर्यंतच्या अंतरिम आकडेवारीनुसार यंदा परभणी जिल्ह्यातील २ लाख ९५ हजार १४३ शेतकऱ्यांनी पिकविम्याचे ५ लाख ७३ हजारांवर अर्ज भरले आहेत. एकूण ३ लाख ८४ हजार ९४८ हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार १९१ कोटी ३९ लाख ६८हजार रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांनी स्वहिश्याचा ४२ कोटी ३३ लाख ४९ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे..Crop Insurance Protest : पीकविम्याच्या मुद्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन.शेतकरी, राज्य, केंद्र यांचा मिळून एकूण ३०५ कोटी ८८ लाख २८ हजार रुपये विमा हप्ता आहे. राज्य सरकारने पीकविमा योजनेत केलेल्या बदलामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान याजोखीमअंतर्गंत मिळणारी वैयक्तिक तसेच मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीमबाबी अंतर्गंत मिळणारी पीकविमा भरपाई मिळणार नसल्यामुळे तसेच शेतकरी हिश्याचा १ रुपया विमा हप्ता देखील बंद केल्याने यंदा खरीप पीकविमा योजनेतील शेतकरी सहभाग कमी झाला आहे..खरीप २०२४ च्या ७ लाख २० हजार ९७७ विमा अर्जाच्या तुलनेत यंदा १ लाख ४७ हजार ३७५ अर्ज कमी भरले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे विमा संरक्षित क्षेत्र ८४ हजार ९७२ हेक्टरने कमी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.