Raigad News: केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ या घोषणेखाली राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनची श्रीवर्धन तालुक्यात दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाच्या नोंदीनुसार तालुक्यातील ६६ योजनांपैकी ३८ योजना १०० टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात उर्वरित २८ गावांमध्ये योजना विविध टप्प्यांवर रखडली आहे. अनेक ठिकाणी टाक्या उभ्या, पाइपलाइन टाकलेल्या पण नळातून पाण्याचा थेंबही येत नाही, अशी परिस्थिती आहे..केंद्र सरकारने ‘हर घर जल’ या घोषणेखाली प्रत्येक गावात पाइपलाइनचे काम हाती घेतले आहे. परंतु श्रीवर्धनमधील २८ गावांमध्ये ही योजना विविध कारणांमुळे रखडली आहे. ही योजना रखडण्याचे मुख्य कारण चुकीचे तांत्रिक प्रस्ताव हे आहे. अनेक गावांत पाण्याचा स्रोत निश्चित न करताच विहिरी खोदल्या गेल्या. यामुळे काही दिवसांतच त्या कोरड्या पडल्या. काही ठिकाणी पायाभूत सुविधा तयार आहेत, परंतु पंप बसवणे किंवा वीजजोडणीमुळे पाणीपुरवठा प्रलंबित आहे. तसेच पावसाळ्यात कामे बंद राहणे आणि उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणे या दुष्टचक्रात ही योजना अडकली आहे. कामांच्या विलंबामुळे प्रकल्प खर्च वाढल्याची चर्चा असून, अंदाजपत्रकापेक्षा अधिक निधीची गरज भासत आहे..Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेचे पाणी लोकांना मिळणार तरी कधी?.दरम्यान, अनेक नळ योजनांमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. पाण्याच्या स्रोतांची अपुरी तपासणी, अंदाजपत्रकातील विसंगती आणि प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थितीशी विसंगत आराखडे यामुळे काही योजना सुरुवातीपासूनच अडचणीत आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर काही गावांत पूर्ण नोंद असूनही वितरण व्यवस्था सुरू नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे..Jal Jeevan Mission : पाण्यासारखा पैसा खर्चूनही ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती.कागदोपत्री पूर्ण दाखविल्या जाणाऱ्या योजनांबाबतही ग्रामस्थांकडूना राजी व्यक्त केली जात आहे. कुडकी, साखरोणे, कोलमांडले, कापोली, कार्ले, गाळसुरे, भट्टीचा माळ, वडवली, बापवन कांडणे, वेळास, जसवली, खरगाव, कोंढेपंचतन, आदगाव कुणबीवाडी, आराठी, कुडगाव, पांगळोली, वडघर, धनगरमलई, भरडखोल, बोलीपंचतन, दांडा, दिघी, हरवीत, मारल देवघर, काळिंजे, कुरवडे काळिंजे, मारल आणि कुरवडे या योजना स्थानिक ग्रामपंचायत अडचणींमुळे रखडल्या आहेत. तर इतर योजना या निधीअभावी रखडल्या आहेत..गावात जलजीवन मिशन योजनेची चर्चा करण्यासाठी अधिकारी व ठेकेदार ग्रामसभेला येत नाहीत. ठेकेदाराला शासनाकडून पैसे मिळत नसल्याने काम बंद असल्याचे समजते. जे काम झाले आहे तेदेखील निकृष्ट दर्जाचे आहे. नवीन पाइपलाइनचा नकाशा सादर केला जात नाही. कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. जुने पाइप वारंवार फुटल्याने चार-पाच दिवस पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते.- सुमीत सावंत, ग्रामस्थ, बोर्लीपंचतन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.