Water Conservation: श्रद्धा-सबुरी संस्थेने रुजविला जलसंधारणाचा पॅटर्न
Environmental Awareness: ‘जल है तो कल है’ असा नारा देत तिगाव (जि. पांढूर्णा, मध्य प्रदेश) येथील श्रद्धा-सबुरी समाजसेवी संस्थेने मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड राज्यात जलसंधारण आणि संवर्धनावर भर दिला आहे. नदी, नाल्यांचे खोलीकरण त्यासोबतच गावस्तरावर जलसंवर्धनाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी जलपरिक्रमा यात्रांचे आयोजन केले जाते. कधीकाळी एका गावापुरती मर्यादित असलेली ही चळवळ आता मध्य प्रदेश राज्यामध्ये जनअभियान झाली आहे.