Ambegaon News: गाईचे दूध काढण्यासाठी गोठ्यात प्रवेश करताच तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडली. शेतकऱ्यावर झडप घालण्यापूर्वीच प्रसंगावधान राखत शेतकऱ्याने धाडसाने जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. ही घटना जाधववाडी (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी (ता. १३) सकाळी सहाच्या सुमारास घडली. .जाधववाडी येथील दूध उत्पादक शेतकरी संतोष जाधव यांनी धाडसाने बिबट्याला पळवून लावले. श्री. जाधव मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास गाईचे दूध काढण्यासाठी गाईंच्या गोठ्यात गेले, या वेळी अगोदरच तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने संतोष यांना पाहून डरकाळी फोडली..Leopard Terror: बिबट्याच्या दहशतीने रस्ते निर्जन.बिबट्या आपल्यावर किंवा पशुधनावर हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेऊन जाधव यांनी न घाबरता गोठ्यातच मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला. आरडाओरड्यामुळे बिबट्याने तिथून धूम ठोकली. या वेळी संतोष जाधव यांनी घरातील लोकांना उठवले आणि झालेला प्रकार सांगितला. सुदैवाने बिबट्यापासून संतोष जाधव थोडक्यात बचावले. या घटनेने बिबट्याच्या भीतीने परिसरात घबराट निर्माण झाली आहे..Leopard Human Conflict: शेतकऱ्यासह बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू.वन विभाग पिंजरे लावेनाजाधववाडी येथील संतोष बबनराव जाधव यांच्या घर आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. येथील नागरिकांनी वन विभागाकडे अनेकदा पिंजरा लावण्याची मागणी करूनदेखील वन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव या तालुक्यांत बिबट्याने मानववस्तीवर केलेले हल्ले आणि लहान मुलांचे घेतलेले बळी पाहता वन विभागाने नागरिकांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून जाधववाडी परिसरातील ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे, त्या ठिकाणी तत्काळ पिंजरे लावणे गरजेचे आहे..सुदैवाने बचावलो...संतोष जाधव म्हणाले, ‘‘सकाळी सहा वाजता गाईंच्या गोठ्यात दूध काढण्यासाठी गेलो आणि मला बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला, त्यामुळे मी थोडासा पुढे गेलो मात्र बिबट्याने मोठमोठ्याने डरकाळ्या फोडल्या, डरकाळ्यांमुळे न घाबरता मोठमोठ्याने आरडाओरडा केला त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला, सुदैवाने मी आणि माझे पशुधन बचावले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.