Solapur News: माळशिरस तालुक्यात सुमारे २ लाखाहून अधिक पशुधन असून, सर्वत्रच ओल्या चाऱ्याचा तुटवडा जाणवत असल्याने उसाचे वाडे घेण्यासाठी सदाशिवनगर येथे शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे. काही ठिकाणी असणारा ओला चारा (मका) घेण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत..तालुक्यात शेळी एक लाख ६७ हजार ३५५, मेंढ्या ३२ हजार ८०६, गाय १ लाख ४६ हजार ७८३, म्हैस ७६ हजार २२८ असे एकूण २ लाख २३ हजार ११ पशुधन आहे. तालुक्यात मे महिन्यात पाऊस झाला त्यानंतर शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी मका पिकास पसंती दिली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पेरणी केलेली मका यापूर्वीच कापणीला येऊन संपली आहे. तालुक्यात ऊसक्षेत्र मोठे आहे. परंतु सततच्या पावसामुळे ऊस पिकाची वाढ पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही. .Green Fodder: हिरवा चारा तयार करा घरच्या शेतात; ज्वारी लागवडीचे सोपे मार्गदर्शन!.मार्च, एप्रिलपर्यंत चालणारे साखर कारखाने आत याच महिन्यात बंद होतील अशी स्थिती आहे. ऊस क्षेत्र संपले आहे. तसेच अनेक कारखान्यांनी ऊस कापणीसाठी यंत्राचा वापर केल्यामुळे उसाचे वाडे उपलब्ध झाले नाही. तालुक्यात बैलगाडीने उसाचे गळीत केले जात होते परंतु आता वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. .त्यामुळे बैलगाडी मालक जनावरांना पुरेल असे वाडे ठेऊन जादा वाडे विकत होता. आता ते बंद झाले. दूध वाढीसाठी कोरड्या चाऱ्याबरोबर ओल्या चाऱ्याची आवश्यकता असते. काही शेतकऱ्यांकडे मका आहे, त्याचा दर आता २२ ते २५ रुपये शेकडा गुंठ्याला झाला आहे..Fodder Shortage : माळरानातही चारा संपला; खानदेशात टंचाईची स्थिती.वाडे जनावरांच्या आवडीचेजनावरांना वाडे गोड लागत असल्याने जनावरे चवीने वाडे खातात. शिवाय हिरवा चारा यादिवसांत कमी मिळत असल्याने वाड्यावरच भिस्त असते. मात्र यंदा वाड्यासाठी पळापळ सुरू आहे..हार्वेस्टरमुळे वाड्याचा तुटवडायंदा अतिवृष्टीमुळे उसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कारखान्याचा गाळप हंगाम कमी दिवस चालेल अशी स्थिती आहे. आणि कारखान्यांनी माणसांच्या तुटवड्यामुळे हार्वेस्टरने ऊसतोडणी सुरू केली आहे. त्यामुळे यंत्रातून वाडे मिळत नसल्याने वाड्याचा तुटवडा आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.