Washim News: वाशीम जिल्ह्यात मालेगाव व इतर काही तालुक्यात रब्बी हंगामाची लगबग सुरू असतानाच युरिया, डीएपी आणि इतर रासायनिक खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात युरिया उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः धावपळ सुरू आहे. अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांना वाढीव दराने काळ्या बाजारातून खते खरेदी करावी लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे..वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहू, हरभरा ही पिके घेतली जातात. त्यामुळे खतांचा पुरवठा सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक असताना अचानकपणे उपलब्धतेत आलेल्या कमतरतेने शेतकऱ्यांचे नियोजनच कोलमडून गेले आहे.Fertilizer Shortage : अमरावतीत रासायनिक खतांचा तुटवडा.शेतकरी गेले काही दिवस रोज खत मिळते का म्हणून दुकानाची पायरी झिजवत आहेत. पण उपलब्धताच नाही. पिकांची वाढ थांबली तर संपूर्ण हंगाम हातातून जाईल, असे अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे..Fertilizer Shortage : मंजूर आवंटना इतका पुरवठा नसल्याने डीएपी खतांचा तुटवडा.दरम्यान, खतांच्या कमतरतेमुळे काही व्यापारी संधीचा फायदा घेत काळ्या बाजारात वाढीव दराने विक्री करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. हे पाहता कृषी विभाग व स्थानिक प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. कृषी विभागाने तातडीने पावले उचलून खतांचा पुरवठा सुरळीत करावा, आणि काळाबाजार थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे..रब्बी हंगामातील या टंचाईने शेतकरी अस्वस्थ झाले असून, पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांना लवकरात लवकर युरिया जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून द्यावा. जूनमध्ये डीएपी खताची सुद्धा अशीच परिस्थिती झाली असता शेवटपर्यंत डीएपी खत जिल्ह्यात उपलब्ध झाले नाही. आज तीच परिस्थिती युरिया खताची झालेली आहे, अशी प्रतिक्रिया सुदी (ता. मालेगाव) येथील विनोद भोयर या शेतकऱ्याने दिली..जिल्ह्यामध्ये गहू पिकाची खूप मोठ्या प्रमाणात पेरणी केली असता जिल्ह्यात कोणत्याच कृषी केंद्रावर युरिया खत उपलब्ध नाही. दुकानदारांना विचारले असता दोन-तीन दिवसांत रॅक लागेल असे सांगतात. पण रॅक कधी लागेल याची काहीच गॅरंटी नाही. गहू पीक आता फुटव्याच्या अवस्थेत असताना त्याला युरियाची खूप गरज आहे. पण मार्केटमध्ये कुठे भेटत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी युरिया शोधासाठी जात आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष द्यावे. - विनोद भोयर, शेतकरी, सुदी, ता. मालेगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.