Washim News: शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी नागरिकांना सातत्याने आधारचा वापर करावा लागतो. परंतु, केंद्रांची संख्या कमी असल्याने सर्वसामान्यांसह वयोवृद्ध नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आधार केंद्रे वाढविण्याची मागणी नागरिकांकडून शासनाकडे केली जात आहे..आधार दुरुस्ती, बायोमेट्रिक अपडेट, मोबाइल लिंकिंग आणि केवायसी या सर्व गोष्टींसाठी नागरिकांना आधार नोंदणी केंद्रांत जावे लागते. मात्र या केंद्रांवर.Dharashiv Flood: संकटाच्या काळात सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे; मदतीत कुठेही कमी पडणार नाही: अजित पवार.प्रचंड गर्दी उसळत आहे. दिवसभर नंबर लागत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, अगदी लहान मुलेही पहाटेपासूनच रांगा लावत आहेत. दिवसभर प्रतिक्षेत असलेल्या गरजूंना आधार केंद्रांतर्फे देण्यात येणाऱ्या मर्यादित.National Security Satellites: भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी दहा उपग्रह : डॉ. व्ही. नारायणन.टोकनमुळे रांगेत उभे राहूनही आपला नंबर येईलच, याची शाश्वती नसते. त्यामुळे केंद्रांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही दबाव वाढला आहे. इंटरनेटची समस्या, बायोमेट्रिकची अडचण, सिस्टिम हँग होणे, वीज समस्या आदी प्रकारांमुळे कामकाज दर तासाला ठप्प होत राहते..आधार केंद्रांची संख्या वाढवा...कारंजा शहरात दोन ठिकाणी आणि ग्रामीण भागात दोन ते तीन ठिकाणी आधार केंद्र सुरू आहेत. अलीकडे अतिवृष्टी नुकसान भरपाई, लाडकी बहीण योजना यासह इतर कारणांनी आधार दुरुस्ती करावी लागत असल्याने केंद्रांवर मोठी गर्दी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात नवीन आधार केंद्रे सुरू करावीत, मनुष्यबळ वाढवून कामकाजाचे तास वाढवावेत, टोकनची संख्या वाढवावी, वृद्ध, दिव्यांग, महिलांसाठी स्वतंत्र रांगा तयार कराव्यात, तांत्रिक अडचणींसाठी त्वरित हेल्पडेस्क सुरू करावा आणि आधार केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.