Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील काही साखर कारखान्यांकडून उसाच्या वजनकाट्यावर काटा मारून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर आल्या आहेत..प्रशासनाने आपल्या पातळीवर वजनकाट्याची तपासणी करून शेतकऱ्यांची साखर कारखान्याकडून होणारी लूट थांबवावी, अशी मागणी शिवबा संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ केसभट यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे..Kolhapur Sugarcane Factory Fraud : कोल्हापुरातील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यात २९ कोटींचा गैरव्यवहार उघड.यासंदर्भात श्री. केसभट यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सध्या साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. शेवगाव तालुक्यातील सुरू असलेल्या साखर कारखान्यांपैकी काही कारखान्यांवर उसाचा काटा मारला जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत..Weighbridge Inspection: कारखान्यांच्या वजनकाट्यांची, ‘भरारी पथका’कडून तपासणी.त्यामुळे याबाबत प्रशासनाने साखर कारखान्यांच्या वजनकाट्याची तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्या कारखान्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा योग्य मोबदला मिळेल याची हमी द्यावी. याबाबत संबंधित तहसीलदार व प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात..तालुक्यातील साखर कारखान्यांकडून उसाची काटामारी थांबवली गेली नाही तर शेतकऱ्यांना समवेत घेऊन शिवबा संघटना तीव्र अंदोलन करेल, असा इशारा श्री. केसभट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.