Akola News: शेतकऱ्यांपर्यंत खरीप हंगामातील पिके तसेच इतर तंत्रज्ञान पोचविण्याच्या उद्देशाने शनिवारपासून (ता.२०) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने (पंदेकृवि) तीन दिवस शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आले. शनिवारी सकाळी ११ वाजता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते शिवारफेरीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी पत्रकार परिषदेत दिली. .या वेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. एस. एस. माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गडाख म्हणाले, की उद्घाटनावेळी पालकमंत्री आकाश फुंडकर, कृषिराज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, कृषीचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कुलगुरू डॉ. इंद्र मणी (परभणी), डॉ. नितीन पाटील (नागपूर) यांच्यासह आमदार,.PDKV Shiwarferi : ‘पंदेकृवि’त शुक्रवारपासून शिवारफेरी.विद्यापीठ परिषदेचे सदस्य, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वर्षी २५ एकर प्रक्षेत्रावर विद्यापीठाने जिवंत प्रात्यक्षिकांची उभारणी केली आहे. विद्यापीठांच्या विविध पीकवाणांसह खासगी कंपन्यांचेही वाण या ठिकाणी लावलेले बघायला मिळणार आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यांतील शेतकरी यात सहभागी होणार आहेत. शनिवारी (ता.२०) अकोला, वाशीम, बुलडाणा, रविवारी (ता.२१) वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि सोमवारी (ता.२२) अमरावती, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होणार आहेत..विद्यापीठ १९८२ पासून शिवारफेरी विद्यापीठ स्थापना दिनाच्या अनुषंगाने घेतली जात आहे. या प्रक्षेत्रासह विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांच्या ११०० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळणार आहे..PDKV Shiwar Feri : ‘पंदेकृवि’ च्या शिवारफेरीने गाठला उच्चांक.अशी आहेत जिवंत पीकप्रात्यक्षिकेखरीप पिके ११२भाजीपाला पिके २७फूलवर्गीय पिके ५९तृणधान्याचे एकूण वाण २४कडधान्ये २३ वाणतेलबिया २९ वाण.कापूस २५ वाणचारा पिके ११ वाणभाजीपाला पिके २७ वाणफुलपिके ५९ वाणतंत्रज्ञान शिफारशी १४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.