Pune News: निराशेच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यासोबत वेळीच संवाद साधल्यास त्याचे जीवन कसे बदलून जाते याचे आदर्श उदाहरण म्हणून ‘शिवार हेल्पलाइन’ चर्चेत आली आहे. राज्यातील कोणत्याही अतिवृष्टिग्रस्ताला केवळ एका फोनवर सल्ला आणि गरज भासल्यास तत्काळ मदत मिळवून देणारा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरतो आहे..शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याच्या उद्देशाने विनायक हेगाणा यांनी ‘शिवार फाउंडेशन’ स्थापन केली आहे. ही संस्था समुपदेशन, सल्ला, मार्गदर्शन आणि मदत या चतुःसूत्रीवर काम करते. श्री. हेगाणा यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ८९५५७७१११५ हा हेल्पलाइन क्रमाक उपलब्ध करून दिला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, की गेल्या आठ वर्षांपासून ३१ जिल्ह्यांमध्ये आम्ही काम करीत आहोत..Farmer Issue: आत्महत्या, की व्यवस्थेचा बळी!.आतापर्यंत दहा हजार ७५४ शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधला. आनंदाची बाब म्हणजे यातील १९८ विमनस्क शेतकऱ्यांना आम्ही निराशेतून बाहेर काढले. आत्महत्येचा विचार सोडून देत ते आता जिद्दीने लढत आहेत. अतिवृष्टीच्या संकटाची व्याप्ती ध्यानात येताच आम्ही हेल्पलाइनची एरवीची १६ तासांची सेवा २४ तास खुली केली आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो शेतकऱ्यांना सल्ला आणि मदत मिळत आहे..Farmer Protest: ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी शुक्रवारपासून राज्यभर आंदोलन.शेतकरी रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत हेल्पलाइनवर संपर्क साधून आपली दुःख सांगण्याचा प्रयत्न करतात. इतर शेतकऱ्यांपेक्षा ते जास्त निराश असतात. कुटुंब झोपी गेल्यानंतर ‘‘पुरात, अतिवृष्टीत माझं सारं पीक नष्ट झालं. आता माझ्याकडे जगण्याचे कोणतेही साधन उरलेले नाही. मी कसे कर्ज फेडू, मी मुलींची लग्न कशी करू, मला आता जीवन संपविण्याशिवाय पर्याय नाही,’’ अशी ह्रदयद्रावक कहाणी अतिवृष्टिग्रस्त शेतकरी बांधव ‘शिवार हेल्पलाइन’कडे मांडत असतात. मात्र, यातील प्रत्येक शेतकऱ्याचे दुःख समजावून घेत त्याला योग्य मदत करण्याचा प्रयत्न ‘शिवार’कडून केला जातो आहे.राज्यातील कष्टकरी शेतकरी केवळ शेतकरी नसून तो जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे आम्ही त्याचे संकट आमचे संकट आहे, असे समजून हा उपक्रम राबवतो आहोत. अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांनी निराश होऊन अजिबात खचून जाऊ नये. केवळ आम्हाला एक फोन करावा. आमच्याशी मनमोकळे बोलावे. अडचण सांगावी. तुमची समस्या सोडविण्यासाठी, मदत मिळवून देण्यासाठी आम्ही चोवीस तास तुमच्यासोबत आहोत. विनायक हेगाणा, प्रमुख, शिवार फाउंडेशन, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.