Jalgaon News: महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत येथील केळी संशोधन केंद्रात केळी दिवस व शिवार फेरी उपक्रम नुकताच घेण्यात आला. यात संशोधन केंद्रातील प्रक्षेत्रातील केळीचे ८० वाण शेतकऱ्यांचे आकर्षण ठरले. .महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून ‘फुले कृषी महोत्सव - २०२६ अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. यात जिल्हाभरातील केळी उत्पादकांसह कुलगुरू डॉ.विलास खर्चे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, केळीतज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील, केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण भोसले, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष विनोद बोरसे आदी उपस्थित होते..Wheat Research Centre: गहू संशोधन केंद्राच्या बळकटीकरणावर भर.थेट पीक प्रात्यक्षिके व शिवार फेरी’ चे आयोजन करण्यात आले. यात देशभरात लागवडीखाली असलेल्या तब्बल ८० केळी वाणांची प्रायोगिक लागवड संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर पाहण्याची संधी उपलब्ध झाली. या वाणांची वैशिष्ट्ये, गुणधर्म, त्यासंबंधी सुरू असलेले संशोधन आदी मुद्द्यांवर या वेळी शेतकऱ्यांनी चर्चा केली. संशोधन केंद्रातील तज्ज्ञांनी याबाबत मार्गदर्शन केले. या प्रक्षेत्रात फुले प्राइड, अर्धापुरी, वसई, श्रीमंती, ग्रँड नैन, विल्यम्स, बसराई, राजापुरी आदी केळीच्या प्रगत वाणांची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत..National Banana Research Centre: राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या समितीवर डाॅ. के. बी. पाटील.केळी बागातील आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मल्चिंग, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, जैविक खते, सेंद्रिय उपाय, निर्यातक्षम घडाचे व्यवस्थापन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर यावर विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. याशिवाय केळीपासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांची माहिती देण्यात आली. त्यात केळी चिप्स, पावडर, पीठ, वेफर्स, केळी वाइन, जॅम आदींच्या निर्मिती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. घरगुती व लघुउद्योग स्तरावरील प्रक्रिया, बाजारपेठेतील संधी आणि उत्पन्न वाढीचे मार्ग याबाबत विवेचन करण्यात आले. यानिमित्त जिल्ह्यातील केळी उत्पादकांचा सत्कार करण्यात आला..केळी पिकाबाबत मार्गदर्शनकेळीची उत्पादन क्षमता व गुणवत्तेतील फरक, लागवड पद्धती, संतुलित खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, ठिबक सिंचन व फर्टिगेशन तंत्रज्ञान, रोग व्यवस्थापन यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पानांवरील रोग, मुळकुज, सूत्रकृमी यांचे निदान व एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धती यांची माहिती देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.