PDKV Akola Agriculture Exhibition: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात रविवार (ता. २०) ते मंगळवार (ता. २२) या कालावधीत ‘शिवार फेरी २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिवार फेरीत शेतकरी, महिला शेतकरी, कृषी विद्यार्थी तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित नागरिकांना विद्यापीठातील विविध संशोधन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शेतीतील नव्या प्रयोगांची माहिती मिळणार आहे..डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मागील काही वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांना खरीप तसेच रब्बीतील पिकांचे तंत्रज्ञान आणि वाण जाणून घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होत असते..PICNIC Farming Technology: ‘पिकनिक’ शेती, अर्थात निसर्गसिद्ध संजीवन शेती .विद्यापीठात विकसित करण्यात आलेल्या विविध पीक वाणांपासून आधुनिक शेती पद्धतीपर्यंतची माहिती प्रत्यक्ष शिवारात उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. संशोधन आणि शेतकरी यांच्यातील दरी कमी करून विद्यापीठात विकसित झालेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे..शिवार फेरीदरम्यान विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रे, कृषी विभाग आणि तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पीक उत्पादनवाढ, सुधारित वाण, पीक संरक्षण, कीड व रोग व्यवस्थापन, मृद व जलसंवर्धन, आधुनिक सिंचन पद्धती तसेच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीतील आवश्यक उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळू शकेल..Kheti Bachav Program: बदलत्या हवामानात आपत्कालीन पीक नियोजनाचे आवाहन.शिवार फेरीचे उद्घाटन रविवारी (ता. २०) सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. या शिवार फेरीसाठी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या २५ एकर क्षेत्रात १३ प्रकारचे तंत्रज्ञान, २१५ प्रकारचे विविध पिकांचे वाण तसेच १४ खासगी कंपन्यांची जिवंत प्रात्यक्षिके एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत..या वर्षी विद्यापीठाच्या ५०० हेक्टर प्रक्षेत्रावर बीबीएफच्या साह्याने सोयाबीन लागवड करण्यात आली आहे. याशिवाय विविध प्रक्षेत्र मिळून ३२०० एकरांवर पीक वाणांची लागवड करण्यात आली आहे. शिवार फेरीदरम्यान विद्यापीठाच्या विविध विभागांचे संशोधन आणि प्रात्यक्षिकेही थेट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.