Raigad News : वडखळ-अलिबाग राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरू आहे गणपती, नवरात्रोत्सव झाला तरी हे प्रशासनाने रस्ते दुरुस्ती केली नसल्याने मंगळवारी पेझारी चेकपोस्ट येथे शेकापच्या वतीने तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. .शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. झोपलेल्या प्रशासनाला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची काहीच चिंता नाही. आज रस्ते हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे, पण वडखळ-अलिबाग राज्यमार्गावर पडलेले खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसौय होत आहे. .Rasta-Roko for Onion Rate : मनमाड-चांदवड मार्गावर कांदा दरासाठी रास्ता-रोको.सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करत आहे, मात्र त्याविरोधात कोणीही आवाज उठवत नाही. त्यामुळे वडखळ-अलिबाग राज्यमार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली आहे..Nashik Rasta Roko : नाशिकमध्ये माकपच्या नेतृत्त्वात चक्काजाम आंदोलन; लाल वादळाची तीव्रता वाढणार? .पोलिसांचा फौजफाटा तैनातराज्यमार्गासोबतच अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात, पण अंतर्गत रस्ते खड्ड्यांनी वेढले आहेत. त्यामुळे प्रवास करणे सर्वसामान्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरले दिवाळीपर्यंत भरले नाहीत, तर खड्ड्यांमध्ये दिवे लावून सरकारचा निषेध करणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले..वाहतुकीचा खोळंबापोयनाडमधून अलिबागच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. परिणामी, कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. तर आंदोलन संपल्यानंतर वाहतूक पूर्ववत करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.