Jambut Sub Market Project Update: कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिरूर कृषी बाजार समितीचा जांबूत उपबाजार सुमारे १५ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ही इमारत परिसरातील मद्यपी आणि जुगार खेळणाऱ्यांचा अड्डा बनली आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे बेट भागातील शेतकरी हक्काच्या बाजारपेठेपासून वंचित आहेत..टाकळी हाजी, जांबूत, कवठे येमाई, पिंपरखेड, चांडोह, वडनेर आदी परिसरांत कांदा, डाळिंब, टोमॅटो, भाजीपाला व इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे, बेट भागातील डाळिंबाने देशासह परदेशातील बाजारपेठेतही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मात्र एवढ्या मोठ्या उत्पादनानंतरही स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध नाही. परिणामी, शेतकऱ्यांना पारनेर, आळेफाटा, ओतूर, नारायणगाव आणि मंचर बाजारपेठांचा आधार घ्यावा लागत आहे..Pune APMC National Status: पुणे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा द्या; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.उपबाजारासाठी आवश्यक इमारती, गाळे, लिलावाची जागा तसेच अन्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत. परिसरातील रस्तेही सुधारले असून दळणवळणाची अडचण नाही. तरीही उपबाजार सुरू करण्यात आलेला नसल्याने बाजार समिती आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे..पिंपळे जगताप, पाबळ आणि तळेगाव ढमढेरे येथील उपबाजार सुरू झाले; मात्र जांबूत उपबाजाराकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. बाजार समितीच्या निवडणुकीत विकासाची आश्वासने दिली जात असली, तरी जांबूत उपबाजार सुरू करण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे..Argentina Cooperative Model: अर्जेंटिनातील सहकारी संस्थांचे कृषी मॉडेल.बाजारपेठ नसल्याने बेट भागात हुंडेकरी पद्धतीने शेतीमाल खरेदीचे प्रमाण वाढले आहे. काही व्यापारी रस्त्याच्या कडेला किंवा थेट शेतात जाऊन मनमानी दराने माल खरेदी करतात. स्पर्धात्मक लिलावाची संधी नसल्याने कमी दरात शेतमाल विकावा लागतो..आश्वासनांचा पाऊस; ठोस निर्णयाची प्रतीक्षाबाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी विकासाच्या घोषणा होत असल्या, तरी १५ ते २० वर्षांपासून बंद असलेल्या जांबूत उपबाजाराचा प्रश्न अद्याप दुय्यमच राहिला आहे. बेट भागातील हजारो शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजारपेठेसाठी स्पष्ट भूमिका कोण मांडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.