Sangli News: बिऊर (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षाच्या राजवीर पाटीलचा मृत्यू झाल्याने लोक शेतात जाण्यास भयभीत झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बिऊर, तडवळे, उपवळे, कदमवाडी ग्रामस्थांनी शेतीला दिवसा वीज द्या, गरजेच्या ठिकाणी विद्युत तारा ओढून गावातील व सर्व वाडी वस्तीवरील पथदिवे सुरु करा, या मागणीसाठी शिराळा येथील विद्युत वितरण कार्यालयासमोर मंगळवारी (ता. ३) ठिय्या मांडला. जो पर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही. तो पर्यंत येथून न हलण्याचा निर्णय घेतला. .त्यावेळी मागण्यांच्या पूर्ततेबाबत दोन दिवसात लेखी देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने नागरिक शांत झाले. मात्र दोन दिवसात लेखी उत्तर न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरुन या अडचणींचे निरसन कधी होणार अशा आणि अनेक प्रश्नांची सरबत्ती करून निरुत्तर केले..Farmers Protest: मागण्या मान्य न झाल्यास उड्या मारो आंदोलनाचा इशारा .यावेळी ॲड. मारुती पाटील, बिऊरचे उपसरपंच श्रीरंग पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, उपवळे सरपंच संभाजी पाटील, सचिन पाटील, सीताराम पाटील, विक्रम पाटील, प्रदीप कदम, प्रवीण पाटील, दिगंबर पाटील, शहाजी पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते. ॲड. मारुती पाटील म्हणाले, की बालकाच्या मृत्युमुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे..बिबट्याच्या भीतीने अंगणात लहान मुले ही खेळायची बंद झाली आहेत. विद्युत वितरण ने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून दिवसा वीज द्या. त्याचे वेळापत्रक ठरवा. बिऊरचे माजी उपसरपंच राजेंद्र पाटील म्हणाले, की रात्री ऐवजी शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी वेळापत्रकात बदल करा. नागरिवस्ती विस्तारित असल्याने लोकांना रात्री ये-जा करण्यासाठी पथदिवे बसवा..Farmers Protest: प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या मोजणीचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद.आमचा भाग डोंगरांनी व्यापला असल्याने बिबटे, गवे, रानडुक्कर, कोल्हे या हिंस्त्र प्राण्यांचा गावात वावर वाढला आहे. व नक्षेत्र जास्त असल्याने अशा वारंवार दुर्घटना घडत असतात. आपल्या सूचना व मागण्या बाबत लवकरात लवकर वरिष्ठांशी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.ग्रामस्थांनी तहसीलदार शामला खोत-पाटील यांना ही निवेदन दिले..जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामे तातडीने मार्गी लावली जातील. त्याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे. बिऊर आणि परिसरात अजून दोन ट्रान्सफॉर्मरची गरज आहे. त्यानंतर स्वतंत्र तारा ओढण्याचे काम करणे गरजेचे आहे.लवकरात लवकर याबाबत वरिष्ठांशी बोलून अडचणी दूर केल्या जातील.एस. के. पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ईश्वरपूर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.