Heavy Rainfall Update: सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार पाऊस आहे. यामुळे वारणा नदी पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोकरूड-रेठरे बंधारा तर म्हैसाळचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. पाथरपुंज येथे १४९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. .शिराळा तालुक्यातील चरण मंडलात ६९.३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ११.० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे..Rain Update: तीन जिल्ह्यांतील १६७ मंडलांत हलका पाऊस .शिराळा तालुक्यात दुसऱ्यादिवशीही संततधार पावसाने हजेरी लावली. शेतात पाणी साचले, ओढे नाले वाहू लागले आहेत. वारणा नदी पाणी पातळीत वाढ झाली आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. धरण परिसरात ७२ मिलिमीटर तर पाथरपुंज येथे १४९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे..Baramati Rain Update: बारामती तालुक्यात पावसाचा दिलासा अपुराच.धरणात १० हजार ११६ क्युसेक इतक्या पाण्याची आवक सुरु आहे. वारणा धरण परिसरात आजअखेर ४२२ मिलिमीटर तर पाथरपुंज येथे १२८८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वारणा धरणात रविवार (ता. ५) सकाळी ८ वाजेपर्यंत १३.३६ टी.एम.सी.पाणीसाठा झाला आहे..जिल्ह्यातील जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात हलका पाऊस झाला आहे. तर वाळवा, पलूस, कडेगाव, विटा, तासगाव, मिरज आणि आटपाडी या तालुक्यात पावसाचा जोर मंदावला आहे. कृष्णा नदी पाणी पातळीत हळू हळू वाढ होऊ लागली आहे. आयर्विन पूलाजवळ ७.६ तर अंकली पूल हरिपूर १२.५ फूट इतकी पाणी पातळी आहे. जिल्ह्यात आजअखेर ४९.९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.