Successful Farmers: एकेकाळी कापूस पिकासाठी ओळख असलेले शेलवड (ता. बोदवड, जि. जळगाव) हे गाव मका पिकासाठी पुढे आले आहे. खरिपासह रब्बीतही या पिकाची लागवड करून त्यातून अर्थकारण उंचावण्याचा इथल्या शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. कमी पर्जन्यमानाच्या स्थितीत भाजीपाला, दुग्धोत्पादनाचा पर्यायही शेतकऱ्यांनी अवलंबला आहे. विविध विकासकामांमध्येही गावाची आघाडी दिसून येते. .जळगाव जिल्ह्यातील शेलवड हे तालुका बोदवडपासून सहा किलोमीटरवरील गाव आहे. बाजार व अन्य बाबींसाठी अधिकचा संबंध जामनेर शहराशी अधिक येतो. गावची लोकसंख्या सुमारे पाच हजारांच्या आसपास असून, गावातील एकूण क्षेत्र सुमारे १५०० हेक्टर आहे. शेती मध्यम, सुपीक आहे. सुमारे ७५ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून, अनेकदा उन्हाळ्यात जलसंकट तयार होते. काही भागांत पुरेसे तर काही भागात कमी जलसाठे अशी स्थिती आहे..Agriculture Success Story: संघर्षातून फुलशेतीचा ध्यास, मजुरीचा थांबला प्रवास.मका पिकाकडे ओढाअनेक वर्षांपासून कापूस हे गावचे मुख्य पीक होते. मात्र दरांमध्ये असलेली अस्थिरता व हवामानातील समस्या पाहता अलीकडील वर्षांत मक्याखालील क्षेत्र वाढले आहे. कापसाचे सहाशे ते सातशे हेक्टरपर्यंत, तर मक्याचे ५०० एकरांच्या आसपास क्षेत्र असावे. जळगाव जिल्ह्यात मका उत्पादनात काही प्रमुख गावे पुढे आहेत. त्यात जामनेर भागातील काही गावांसह पाचोरा, पारोळा तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. शेलवड गावच्या बाबतीत सांगायचे, तर खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत मका असतो. .काही शेतकऱ्यांनी मक्यासह सोयाबीन व तूर असेही प्रयोग केले आहेत. खरिपात चांगला पाऊस झाल्यास व हंगाम चांगला झाल्यास खरिपात एकरी १५ ते १८ क्विंटलच्या दरम्यानही उत्पादन साधते. मात्र अनेकदा अमेरिकन लष्करी अळीचा हल्ला वाढतो. प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादनात २५ टक्के घट येते. फवारणीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होते..खरिपात शाश्वत उत्पादनासाठी शाश्वत सिंचनाची सोय शेतकऱ्यांना हवी आहे. बोदवड उपसा योजना अनेक वर्षांपासून रखडली आहे. ती कार्यान्वित झाल्यास समस्या दूर होऊ शकते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रब्बीत मात्र एकरी २० ते २५ क्विंटलच्या दरम्यान उत्पादन शेतकरी गाठतात..बाजारपेठ, दरांचे गणितमक्यास जामनेर, मुक्ताईनगर व अन्य भागांत मोठी बाजारपेठ आहे. काही प्रक्रिया उद्योजकही मका घेऊन जातात. मक्यासंबंधी स्टार्च कारखाना शेलवडपासून काही अंतरावर असलेल्या मालदाभाडी (ता. जामनेर) येथे उभा राहिला होता. आता वाडीकिल्ला, जामनेरातच मका खरेदीची मोठी खासगी केंद्र तयार झाली आहेत. तेथे बारमाही खरेदी होते. दर तेजीत राहिल्यास खरेदीदार थेट शिवार खरेदी करतात. .Vegetable Farming: काशीफळ, दुधी भोपळ्याचा पावसाळी हंगामात आधार.यात वाहतुकीचा खर्च कमी होतो. पावसाळी हंगामात कमी दर मिळतात. जानेवारीपासून दरात सुधारणा होते. हिवाळ्यातील हंगामाची काढणी मार्चमध्ये सुरू होते. पण वाहतूक परवडत नाही. काही शेतकरी मळणीनंतर बाजारपेठेचा अभ्यास करून साठा करतात. मागील खरीपात दर ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल होते. त्या वेळी पीक परवडले नाही. मागील रब्बीतही कमाल दर १५०० रुपये होता. मागील तीन वर्षे सरासरी १४०० रुपये दर मिळाला आहे. सन २०२४ मध्ये दर २१०० रुपयांपर्यंत मिळाला. दर टिकून राहिल्यास त्याची शेती आणखी वाढू शकते. चाऱ्यास मागणी राहिल्यास नफ्याचे प्रमाण वाढते. एकूणच मका पिकाने शेलवड ग्रामस्थांचे अर्थकारणात सुसह्य किंवा स्थिर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे..भाजीपाला उत्पादनातही अग्रेसरकेवळ पीक उत्पादनावर नव्हे, तर जमीन सुपीकतेचे महत्त्वदेखील गावचे शेतकरी जाणून आहेत. शेतातील अवशेष न जाळता त्यांचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. बागायती कापसाचे एकरी सात- आठ क्विंटलपर्यंत उत्पादन सातत्याने अनेक शेतकरी घेत आहेत. कापूस, मका यांच्यासह भाजीपाला शेतीही शेलवडच्या शेतकऱ्यांना भक्कम आधार देते..काही शेतकरी हंगामी भाजीपाला घेतात. कैलास माळी व कडू रामा माळी यांना ३० ते ३५ वर्षांपासून भाजीपाला शेतीचा अनुभव आहे. वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, काकडी, मिरची, कोबी आदी पिके कडू घेतात. दोन एकरांत त्यांचे शेडनेट हाउस आहे. तसेच मुक्ताईनगर, जामठी (ता. बोदवड), शेलवड (ता. बोदवड), बोदवड या बाजारांत त्यांचे भाजीपाला विक्रीचे स्टॉल असतात. उल्हास व कैलास हे माळी पिता-पुत्र कलिंगड, टोमॅटो, वांगी, कोबी, मिरची आदी पिके बारमाही घेतात. गजानन माळी नोकरी सांभाळून भाजीपाला शेतीत अग्रेसर राहिले आहेत..दूध उत्पादनात पुढेकमाल क्षेत्र कोरडवाहू असल्याने गावातील शेतकऱ्यांनी शेतीला पूरक आधार म्हणून गाय, म्हैसपालन सुरू केले आहे. मका क्षेत्र वाढीस लागल्याने चाऱ्याची अडचण अनेकदा नसते. विजय सोननी, योगेश राजू जवरे, ज्ञानेश्वर माळी, नीलेश गावंडे, गजानन साठे हे काही आघाडीचे दुग्धोत्पादक सांगता येतील..सुमारे १५०० म्हशी, तर ५०० च्या आसपासगाईंची एकूण संख्या आहे. गावात दररोज एक वेळेसदोन हजार लिटरपेक्षा अधिक दूध संकलन होते. दोनखासगी व महिला गटाचे दूध संकलन केंद्र आहे. म्हशीच्या दुधाला फॅट व एसएनएफनुसार कमाल ६२ रुपये प्रति लिटरपर्यंत दर मिळतो. शेळीपालनालाही गती मिळाली आहे..शेलवडमधील विकासकामेशेलवड विकासकामांमध्येही आघाडीवर आहे. गावानजीक दोन तलाव आहेत. पैकी पूर्वेला कुरण तलाव महत्त्वाचा आहे. मुख्य रस्त्याच्या लहान तलावातून गाळ काढण्यावर भर असतो. त्यामुळे तलावांची साठवणक्षमता टिकून राहते. शिवाय गाळाचा उपयोग शेतात करणेही शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. गावतील अनेक भागांत काँक्रीटचे रस्ते तयार झाले आहेत. सौर ऊर्जा यंत्रणा वापराकडे अनेकांचा कल आहे. .दोन वेळेस अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह होतात. बालाजी संस्थानचे नाट्यगृह असून त्याद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमांना बळ मिळते. गावातील व्यक्तींनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. पैकी हरिभाऊ दगडू जवरे विधान परिषदेचे सदस्य, तर अशोक विठोबा सोननी बोदवड पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत.विजय सोननी ७४९८४१७०४३गजानन माळी ७३५०९३२९५३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.