Water Shortage Impact: दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पाण्याअभावी फळबागा जगविण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. पाण्याची खालावलेली पातळी, बोअरवेलला मर्यादित पाणी आणि मोसंबीला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेलगाव (ता. अर्धापूर) येथील शेतकरी हनुमंत पाटील राजेगोरे यांनी दोन एकरांवरील मोसंबीची बाग काढून टाकण्याचा कठोर निर्णय घेतला. तब्बल २६ वर्षे जोपासलेली बाग जेसीबीच्या साह्याने काढताना त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे..राजेगोरे यांनी सन २००० मध्ये निजामपुरवाडी (ता. अर्धापूर) येथील आपल्या शेतात दोन एकर क्षेत्रावर मोसंबीची लागवड केली होती. पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत त्यांना ६४ हजार रुपयांचे अनुदान मिळाले होते..Orange Orchard Damage: उष्णता, पूर्वमोसमी पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका.सुरुवातीच्या दोन वर्षांत त्यांनी बागेत आंतरपीक घेतले. त्यानंतर मोसंबीच्या झाडांची निगा राखत बाग वाढविली. मोसंबीच्या झाडांना चांगला बहार येण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत पाण्याचा ताण द्यावा लागतो. त्यानंतर उन्हाळ्यात झाडांना पुरेसे पाणी देणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे बागेच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता महत्त्वाची ठरते..मागील वर्षापर्यंत त्यांच्या शेतातील बोअरवेलमधून मुबलक पाणी उपलब्ध होत होते. मात्र, यंदा त्यांच्या शेतासह परिसरातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी, बोअरवेल अवघा अर्धा ते एक तासच चालत आहे. एवढ्या मर्यादित पाण्यावर मोसंबीची झाडे जगविणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरीकडे, दुष्काळी परिस्थितीत बागेवर पुढील खर्च करणेही आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. पाणी उपलब्ध होण्याची शाश्वती नसल्याने अखेर त्यांनी मोसंबीची संपूर्ण बाग काढून टाकली..Agriculture Water Scarcity: पाणी उपलब्ध करून द्या, वाहतुकीचा खर्च आम्ही करू; फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी.विशेष म्हणजे, राज्यासह देशात दुष्काळी परिस्थिती असतानाही आणि बाजारात मोसंबीची आवक साधारण असतानाही उत्पादकांना अपेक्षित दर मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे..एका बाजूला पाण्याचे संकट, दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्च आणि तिसरीकडे बाजारभावाची अनिश्चितता, अशा तिहेरी संकटात फळबाग उत्पादक अडकले आहेत. पाण्याअभावी फळबागा टिकवायच्या कशा आणि बाजारभाव मिळत नसताना त्यावर खर्च करायचा किती, हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा आहे. दुष्काळाचा फटका केवळ हंगामी पिकांनाच नव्हे, तर वर्षानुवर्षे जोपासलेल्या फळबागांनाही बसत असल्याचे राजेगोरे यांच्या निर्णयातून स्पष्ट होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.