Ahilyanagar News: कर्जत तालुक्यातील तीन व जामखेड तालुक्यातील एक अशा चार तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजना (ब वर्ग) अंतर्गत या तीर्थक्षेत्रांना आता ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. .विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ५ मार्चला यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केले आहेत..Vidarbha Tourism: चिखलदऱ्याच्या स्कायवॉकच्या डेकचे काम पूर्ण; मार्चचा मुहूर्त.या निर्णयामुळे जामखेड तालुक्यातील श्री जवळेश्वर देवस्थान (जवळा) या ऐतिहासिक देवस्थानासह कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र जगदंबा मंदिर देवस्थान (कुळधरण), श्री खंडोबा देवस्थान (शेगुड) आणि श्री लालगीर बुवा मठ ट्रस्ट (मांदळी) या चारही देवस्थानांचा आता ‘ब’ वर्ग श्रेणीत समावेश झाला आहे..Agro Tourism: कृषी पंढरी ॲग्रो टूरिझम देणार शेती, कोकण संस्कृतीचे धडे: निकम.तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे आता या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी शासनाकडून पाच कोटी रुपये प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी निधी मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भाविकांच्या निवासासाठी सुसज्ज भक्तनिवास, सभागृह, तीर्थक्षेत्राकडे जाणारे प्रशस्त रस्ते, अंतर्गत सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्याची सोय आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या कामांना प्राधान्य मिळणार आहे..तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणारराज्य निकष समितीने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतलेल्या बैठकीत या प्रस्तावांची सविस्तर छाननी करून त्यांना मंजुरी दिली होती, त्यानंतर आता शासन निर्णय झाल्यामुळे या भागातील धार्मिक पर्यटनाला आणि स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे. प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत-जामखेडमधील तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार असून, या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.