Pune News: सततच्या पावसामुळे आणि अपेक्षित तापमान न मिळाल्याने विविध पिकांसह पशुधनाला देखील फटका बसला आहे. गेल्या काही दिवसात मेंढ्यांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव आणि मरतुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. पोंढे (ता.पुरंदर) येथील एका मेंढपाळाच्या सुमारे १०० पेक्षा अधिक मेंढ्याचा टप्पाटप्प्याने मृत्यू झाला. राज्यात सर्वत्र ही समस्या जाणवू लागल्याने मेंढपाळ अडचणीत आले आहेत..या वर्षी पावसाळा लांबल्याने मेंढपाळांना मेंढ्यांच्या विसाव्यासाठी स्वच्छ, कोरड्या जागा मिळणे अवघड झाले होते. पावसाने विसाव्याच्या जागाही ओल्या झाल्या आहेत. प्रतिकूल वातावरणामुळे मेंढ्यांची प्रतीकारक्षमता कमी झाली. तसेच संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रामुख्याने खुराला संसर्ग झाल्याने त्यांची हालचाल मंदावली आहे. अंगावर लहान गाठी दिसत आहेत. काही ठिकाणी न्यूमोनियाची लक्षणे दिसत आहेत..Farmers Crisis: शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांवर दुहेरी संकट.पोंढे (ता. पुरंदर) येथील मोहन वाघले, भिवाजी वाघले यांच्या मेंढ्यांमध्ये आजाराचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही महिन्यात १०० पेक्षा अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत. असाच प्रकार राज्याच्या विविध भागांत जाणवू लागला आहे. यामध्ये सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, दौंड, बारामती परिसराचा समावेश आहे..Heavy Rain Impact: लोकप्रतिनिधी बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर.औषध विक्रेत्यांकडून लूटमेंढ्यांची मर होऊ नये याकरिता मेंढपाळ औषध विक्रेत्यांकडे हेलपाटे मारत आहेत. मेंढपाळांच्या या अगतिकतेचा फायदा अनेक औषधी विक्रेते उठवत असल्याचे दिसत आहे. अगदी कमी किमतीतील औषधे विक्रेते अधिकच्या किमतीने विकत असल्याचे पोंढे येथे शासकीय पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले..यंदा पाऊस लांबल्याने मेंढ्या राखणीसाठी मेंढपाळांना कोरडी जागा मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे दिवसभर पाऊस आणि रात्री निवाऱ्याला देखील जमीन ओली असल्याने खुराचे संसर्ग वाढलेले दिसत आहेत. याबाबत सर्व जिल्हा आणि तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार आणि जनजागृतीबाबत सूचना दिल्या आहेत. मेंढपाळांनी शक्यतो निवाऱ्यासाठी कोरड्या जागेची निवड करावी. संसर्ग होऊ नये म्हणून कॉपर सल्फेटच्या पाण्याने मेंढ्याचे खूर धुवून घ्यावेत. संसर्ग झालेल्या मेंढ्यांना वेगळे ठेवावे, लोकर वाढलेल्या मेंढ्यांची तातडीने लोकर कापणी करावी.डॉ. शीतलकुमार मुकणे, अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.