मागील काही दिवसांत तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. त्याचा रब्बी पिकांसह फळपिकांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राज्यातील विविध कृषी विद्यापीठांतील तज्ज्ञांनी दिलेला सल्ला..हरभरायंदा लांबलेल्या पावसामुळे बहुतांश भागात हरभरा लागवडीस विलंब झाला. हिवाळ्यातील १५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान हरभरा पिकासाठी पोषक ठरते. मात्र तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास हरभरा पिकामध्ये परागीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन घाटे भरले जात नाहीत. घाटे भरले तरी पोचट राहतात. पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पीक वाढीवर झालेल्या परिणामामुळे पिकाची वाढ मंदावून खुंटते. घाटे कमी भरले जाऊन एकूण उत्पादनावर परिणाम होतो..Crop Protection: कीड पुनरुज्जीवन समस्या व उपाय तंत्र.गहूगहू पीक वाढीसाठी ७ अंश ते २१ अंश सेल्सिअस तापमान हे पोषक मानले जाते. सद्यःस्थितीत वातावरण गहू पिकासाठी अत्यंत पोषक आहे. परंतु तापमानामध्ये जास्त घट झाल्यास गव्हाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. तापमान ७ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास काही कालावधीसाठी पिकाची वाढ कमी होते. तापमान ४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास पिकामध्ये ‘कोल्ड इंजुरी’ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पिकाची वाढ खुंटणे, फुटवे येणे थांबणे, असे परिणाम दिसून येण्याची शक्यता असते..करडईसध्या करडई लागवड होऊन साधारणपणे ४० ते ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हिवाळ्यात कमी झालेले तापमान करडई पिकासाठी पोषक असते. फांद्या फुटण्याच्या अवस्थेतील पिकास सद्यःस्थितीत कमी झालेले तापमान अधिक पोषक ठरते. करडईची लुसलुशीत पानांवर प्रादुर्भाव करणाऱ्या पाने खाणारी अळी आणि मावा किडीस अति थंडीमुळे नैसर्गिकरीत्या रोखले जाते..Crop Protection: कीड-रोगावर नियंत्रणासाठी पीक निरीक्षणाची गरज .भाजीपाला पिकेरब्बी हंगामात तापमान खूपच कमी झाल्यास भाजीपाला बियाण्यांची उगवण क्षमता कमी होते. काही वेळा उगवणदेखील होत नाही. भाजीपाला पिकांच्या वाढीवर कमी झालेल्या तापमानाचा प्रतिकूल परिणाम होतो. कमी तापमानामुळे फुलधारणा व फळधारणा कमी प्रमाणात होते. अचानक तापमान कमी झाल्यामुळे टोमॅटो पिकामध्ये फळांना तडे जातात. त्यामुळे फळांचा दर्जा खालावतो. कांदा पिकामध्ये अतिथंडीमुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. वांगी पिकाची वाढ खुंटते, पाने सुकून करपल्यासारखी दिसतात. मावा, फुलकिडे या रस शोषणाऱ्या किडींचा तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो..लिंबूवर्गीय फळपिकेतापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यानंतर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील फळझाडांची कार्यशक्ती कमी होते. त्यापेक्षाही तापमान कमी झाले तर झाडांच्या पानांना इजा होऊन ती वाळल्यासारखे दिसतात. फळांना भेगा पडतात व ती काळी पडतात. खोड व फांद्यांचा मध्यभाग काळपट होतो. परंतु बाहेरील साल सुस्थितीत असते. ही इजा मुख्यत्वे रोपवाटिकेतील रोपांना इजा होते. खोडाची जमिनीलगतची साल फाटते. अति थंडीमुळे पेशीतील पाणी गोठल्यामुळे पेशी फाटतात, मुळांना तडे जातात. खूप कमी तापमानात (१ ते २ अंश सेल्सिअस) झाडास चिलिंग इंजुरी होते. तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्यास झाडाला फ्रीजिंग इंजुरी होते. त्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्यांच्या वहनामध्ये अडथळा येतो..Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ.द्राक्षद्राक्ष बागेतील किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय क्रियांचे संतुलन बिघडते. मण्यातील हिरवे रंगद्रव्य गुलाबी रंगात बदलू शकते, या समस्येला गुलाबी मणी (पिंक बेरी) म्हणतात. ही विकृती टाळण्याकरिता घड पेपरने झाकून घ्यावेत. त्यामुळे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. वाढत्या थंडीमध्ये घडामधील वाटाण्याइतक्या आकाराचे हिरवे मणी तडकणे अशा समस्या दिसून येतात. तसेच वाढत्या थंडीमध्ये भुरीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये असणारा कमी तीव्रतेचा सूर्यप्रकाश भुरीसाठी पोषक ठरतो. सध्या फुलोऱ्यामध्ये असलेल्या बागांमध्ये भुरीसाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर प्रभावी ठरतो..केळीतापमान १२ ते १३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास केळीची फळे, झाडे किंवा पानांना चिलिंग इंजुरी (थंडीमुळे इजा) होण्याची शक्यता असते. वाढत्या थंडीमुळे मुळ्यांच्या अन्न व पाणी शोषणाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अन्नद्रव्यांचे शोषण व वहन योग्यरीत्या न झाल्याने पाने पिवळसर दिसतात. नवीन येणाऱ्या पानाची पुंगळी उलगडण्यास वेळ लागतो. पुंगळीच्या बाहेरील बाजूवर चट्टे दिसून येतात. एकूण वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो. केळी घड अडकतात. घड कमी भरतात. थंडीमुळे केळीची साल काळी पडणे किंवा तपकिरी डाग पडणे. साल निस्तेज, राखाडी किंवा काळी पडणे. फळे न पिकणे किंवा असमान पिकणे किंवा कडकपणा वाढणे अशा समस्या दिसून येतात. यंदा अनुकूल हवामानामुळे केळी बागांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. बागेतील करपा रोगग्रस्त पाने किंवा पानाचा रोगग्रस्त भाग बागेबाहेर नेऊन नष्ट करावा. नियंत्रणासाठी शिफारशीत बुरशीनाशकांचा आलटून- पालटून फवारणीद्वारे वापर करावा..Crop Protection: अतिवृष्टीनंतर कापूस पिकावरील बोंड सडचे व्यवस्थापन कसे कराल?.केसर आंबा दरवर्षी केसर आंब्यामध्ये जूनमध्ये आलेली पालवी पक्व होऊन पुन्हा ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीस त्यावर पालवी येते. अशा पालवीवर पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केला असल्यास थोडीफार थंडी सुरू झाली तरी दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान मोहर येणे सुरू होते. तो मोहर नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत पूर्ण बाहेर येतो. परंतु या वर्षी पाऊस, ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा राहिल्याने ऑगस्ट, सप्टेंबरची पालवी आलेली नाही. ऑक्टोबरच्या शेवटी ऊन पडायला लागल्यानंतर काही बागांमध्ये थोडीफार पालवी आली. तर काही बागांमध्ये त्याच काडीवर अतिशय थोडाफार मोहर सुरू झाला. नोव्हेंबर महिन्यातही थंडीचे प्रमाण बऱ्यापैकी होते..पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केलेल्या बागांमध्ये सद्यःस्थितीत ८० ते ९० टक्क्यांपर्यंत मोहर आलेला आहे. ज्या बागांमध्ये अद्यापही मोहर आलेला नाही, अशा बागांमध्ये मोहर येण्यासाठी या थंडीचा फायदा होईल. पॅक्लोब्युट्राझोलचा वापर न केलेल्या बागांमध्ये डिसेंबरच्या मध्यावर ते अगदी जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत मोहर येतो, अशा बागांमध्ये या थंडीमुळे मोहर यायला बऱ्यापैकी मदत होईल. आंबा पिकामध्ये मोहर बाहेर पडेपर्यंत थंडीचा कडाका हा फायद्याचा ठरतो. परंतु मोहर आल्यानंतर उमललेला असताना कडाक्याची थंडी असेल तर पूर्ण मोहर गळून जाण्याची शक्यता असते. मोहर आलेल्या बागांमध्ये थंडीमुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी मोहराचे भुरी रोगापासून संरक्षण करण्यासाठी नियंत्रणाचे उपाय करावेत..करावयाचे उपायफळझाडाच्या खोडाजवळ व आळ्यात तनिस, गवत, पालापाचोळा, गव्हाचे तूस इत्यादींचे आच्छादन करावे. रात्रीच्या वेळी फळबागेत ठिकठिकाणी ओला पालापाचोळा पेटवून धूर करावा. त्यामुळे बागेतील तापमान वाढीस मदत मिळते. पालाशयुक्त खते, वरखते, म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मात्रा दिल्यास फळझाडाची पाणी व अन्नद्रव्ये शोषणाची क्षमता वाढते. फळबागेच्या पश्चिम व दक्षिण दिशेने वारा प्रतिबंधक वृक्षांची लागवड करावी. त्यामुळे शीतलहरींपासून बागेचे संरक्षण होते. तसेच बागेभोवती मध्यम उंचीच्या कुंपण झाडांची लागवड करावी. या झाडाची सतत निगा व छाटणी करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.