Solapur News : गेल्या १५ दिवसांत बँकांनी एक हजार ४०० शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा हप्ता कंपनीकडे भरला आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत होती; या मुदतीत ६४ कर्जदार शेतकऱ्यांनी अर्ज केला होता. .ती संपल्यानंतर बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांचा अर्ज स्वीकारण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मुदतीत एकूण एक हजार ४६४ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला आहे. यंदा प्रधानमंत्री पीकविमा योजनेत झालेल्या मोठ्या बदलामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीकविमा भरणे टाळल्याचेच चित्र जिल्ह्यात आहे..Crop Insurance: खरीप पीक विम्याचे ८ लाख ६० हजार अर्ज.जिल्ह्यात गतवर्षी खरिपात सात लाख ३८ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. त्याद्वारे पाच लाख ४४ हजार ८७१ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते. यंदा २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात चार लाख ४५ हजार ८३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे..Crop Insurance Issue: पीकविमा प्रकरणी शेतकऱ्यांचा संताप.तर जिल्ह्यात ११ व्या कृषी गणनेनुसार आठ लाख ९३ हजार ६७७ शेतकरी आहेत. मात्र, त्या तुलनेत यंदा पीक विम्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या पाहता बंद केलेला एक रुपया पीकविमा हप्ता, उत्पन्नावर आधारित योजना व भरपाईच्या पद्धतीत केलेले बदल व मंडल आणि तालुकानिहाय अधिसूचित पिके शेतात नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्याकडे पाठ फिरवली आहे..पीकविम्याची आकडेवारीअर्ज केलेले कर्जदार शेतकरी १,४६४अर्ज केलेले बिगर कर्जदार शेतकरी ३,२९,३२२अर्ज केलेले एकूण शेतकरी ३,३०,७८६विमासंरक्षित क्षेत्र २,४९,७३८.४४शेतकरी हिस्सा १८,२३,४४,९५९.१९राज्य हिस्सा ६६,९७,३४,८७२.१९केंद्राचा हिस्सा ६६,९७,३४,३७३.१९एकूण विमा हप्ता १,५२,१८,१४,२०४.५७विमा संरक्षित रक्कम १०,९८,४३,५८,९७३.७४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.