Latur News: वेगवेगळ्या संकटामुळे बऱ्याचदा बाजारात भाज्या मिळत नाहीत, भाज्यांचे भाव अचानक वाढतात किंवा अतिउत्पादनामुळे भाज्या टाकून द्याव्या लागतात. हे चित्र आपण अनेकवेळा पाहतो. म्हणून एकावेळी शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा फायदा व्हावा यासाठी भाज्यांची पावडर बाजारात आणावी, यासाठी लातूरमधील एका तरुणाने ड्राय लिफ नावाने स्टार्ट अप सुरू केले आहे. या अनोख्या स्टार्ट अपची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरने दखल घेतली असून ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ही जाहीर केली आहे..अभिषेक कदम असे या तरुणाचे नाव आहे. तो लातूर तालुक्यातील वांजरखेडा येथील असून त्याच्या स्टार्ट अपची ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’साठी निवड केली आहे..Commonwealth Startup Fellowship: कॉमनवेल्थ फेलोशिपसाठी तीन भारतीय स्टार्टअपची निवड.राज्यातील ४० तरुणांची या समितीने निवड केली असून त्यात लातूरमधील अभिषेक हा एकमेव आहे. कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर आपल्या कल्पनेतून नवीन उपाय शोधू पाहणाऱ्या तरुणांना पाठबळ देण्यासाठी ही फेलोशिप दिली जाते..Maharashtra CM Fellowship 2025-26: महिना ६१ हजार देणारी पदवीधरांसाठी फेलोशिप; अर्ज प्रक्रियेला सुरुवात.लातूरमधील कृषि महाविद्यालय येथे अभिषेकचे पदवीचे शिक्षण झाले आहे. पदव्युत्तर शिक्षण त्याने हैदराबाद येथे पूर्ण केले आहे. त्याने एरंडी या पिकावर संशोधन केले आहे. सध्या त्याने ड्राय लिफ नावाने स्टार्ट अप सुरू केले आहे. या माध्यमातून बचत गटांना प्रशिक्षण देवून त्यांच्याकडून गाजर, बीट, हिरवी मिरची, शिमला मिरची, आवळा, पालक, फ्लावर, शेवगा अशा भाज्यांची पावडर बनवून घेतली जाणार आहे. .सध्या ड्राय लिफ मध्ये शेवग्याची पावडर बनवली जात आहे. भाज्या हा नाशवंत माल असतो. ठराविक वेळेनंतर भाज्या खराब होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान होऊ नये आणि ग्राहकांनाही भाज्या मिळाव्यात म्हणून हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या उपक्रमाला ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’मुळे नवे बळ मिळेल, असा विश्वास वाटतो, असे अभिषेकने सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.