पराभव स्वीकारता आला पाहिजे, फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तरआम्ही योजना केल्या. त्या लोकांना आवडल्या म्हणून त्यांनी आम्हाला मतदान केलेपवार म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीआधी पैसे वाटणे अयोग्य .Bihar Election Results 2025: जो जिता वही सिंकदर... पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण करायला हवे. पण विरोधी पक्षाला आत्मपरीक्षण मान्य नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिहार निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या विरोधकांना दिले आहे. .सगळ्यांना वेगवेगळ्या योजना करण्याची संधी होती. ज्यावेळी त्यांचे सरकार होते, त्यावेळी त्यांनी त्या केल्या नाहीत. आम्ही योजना केल्या. त्या लोकांना आवडल्या. त्यांनी आम्हाला मतदान केले. त्यावर लोकांना दोष देण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी केला .Bihar Election Result: ‘एक्झिट पोल’चा अंदाज ठरला खरा.मुंबईचा महापौर 'महायुती'चाच- फडणवीसमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्ष एकत्रित लढतोय की स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेला महायुतीचा महापौर बनविण्याचा निर्णय घेतला आहे. .Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे श्रेय लाडक्या बहिणींना.निवडणुकीचे मतदान महिलांनी हातात घेतले- शरद पवारदहा हजार रुपयांमुळे बिहारमध्ये एनडीएला सत्ता मिळाली असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये सगळ्या महिलांच्या खात्यात १० हजार भरले, त्यांचा हा परिणाम झाला असावा. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीआधी पैसे वाटणे अयोग्य असून हे चिंताजनक आहे. पैसे देऊन निवडणूक लढवणे हे पारदर्शकपणाचे लक्षण आहे का? असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. .या निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी बोललो, त्यांच्याकडून मला फिडबॅक मिळाला की या निवडणुकीचे मतदान महिलांनी हातात घेतले. १० हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही, असे पवार यांनी नमूद केले. .कोणतीही निवडणूक असो ती स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे. यावर आता निवडणूक आयोगाने विचार करावा, असे पवार यांनी सूचित केले आहे..महाराष्ट्रामध्येही निवडणुकीच्या आधी पैसे वाटण्यात आले. पण प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही. तर सरकारवतीने अधिकृत पैसे देण्यात आले. म्हणजेच लाडकी बहीण योजना. बिहारमध्येही असेच झाले. येथून पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी पैशांचे वाटप करुन निवडणुकीला सोमारे जायचे असे ठरवले तर निवडणूक प्रक्रियेवरील लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.