Sharad Jare Appointment: राज्याच्या पणन संचालकपदी शरद जरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जरे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. .विकास रसाळ यांच्या सेवानिवृत्तीनंतर पणन संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र आता राज्य शासनाने जरे यांची नियुक्ती केली आहे. कदम यांनी बुधवारी (ता. ८) श्री. जरे यांच्याकडे पदभार सुपूर्द केला..APMC Directors Issue: मुंबई बाजार समिती सभापती, संचालक अपात्र ठरणार?.दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जरे यांनी मुंबई बाजार समितीमध्ये सचिव म्हणून काम करत असताना, बाजार समितीला शिस्त लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले. .Mumbai APMC: शेतीमाल थकबाकी तक्रारीची दखल.शिस्तीचा एक भाग म्हणून, त्यांनी संचालक मंडळाच्या सभांना सातत्याने गैरहजर राहणाऱ्या सभापती आणि सात संचालकांच्या अपात्रतेचा अहवाल पणन संचालनालयाला पाठविला होता. Mumbai APMC Director.आता त्यांच्या या अहवालावर पणन संचालक म्हणून जरे स्वतः सुनावणी घेणार असल्याने, सभापती आणि संचालकांचे धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.