Satara News : शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या उसाला चांगला दर मिळावा यासाठी दरवर्षी शेतकरी संघटना आग्रही असते. यंदाही एफआरपी एकरकमी मिळावी, ऊसदर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नये अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. .सध्या जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा हंगामही सुरू होत आहे. त्यातच पाटण (जि. सातारा) तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याच्या वतीने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी उसाला पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर करून ऊसदराची कोंडी फोडली आहे..सातारा जिल्ह्यातील इतर साखर कारखाने आता किती पहिली उचल देणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान ऊसदर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांची धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांना देऊन आंदोलनाची तयारी सुरू केली आहे..Sugarcane Season : विनापरवाना गाळप बंद करा.पश्चिम महाराष्ट्र हा साखर कारखान्यांचा, उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता असल्याने बहुतांश शेतकरी हे उसाचेच पीक घेतात. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता जाहीर करावा अन् मगच कारखाने सुरू करावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटनांनी केली आहे. .सध्या जिल्ह्यातील अनेक कारखान्यांचे गव्हाणीत मोळी टाकण्याचे कार्यक्रम झाले आहेत. जे कारखाने सुरू झाले आहेत त्यांनी मात्र यंदाच्या उसाच्या दरासंदर्भात मौन बाळगले होते. कालपर्यंत जिल्ह्यात असलेल्या सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांपैकी एकाही साखर कारखान्याने ऊसदर जाहीर केलेला नव्हता. मात्र पालकमंत्री देसाई यांनी घोषणा केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फुटली आहे..सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळपास गेलेल्या उसाला काही कारखान्यांचा अपवाद वगळता सुमारे ३२०० ते ३२६० रुपयांचा दर दिला आहे. त्यावेळी साखरेचे भाव ३४०० ते ३६०० रुपयांवर होते. त्यामुळे साखर कारखान्यांना तेवढा दर देता आला. .Sugarcane Season : आम्ही चाललो ऊस तोडणीला....त्याचबरोबर तो दर देण्यासाठी साखर कारखान्यांच्या उपपदार्थ निर्मितीचाही हातभार लागला होता. इतर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक घ्यावी, अशी मागणी सर्वच शेतकरी संघटनांनी केली आहे..यंदाच्या गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला साखर कारखान्यांनी प्रति टन तीन हजार ७५१ रुपयांची विनाकपात पहिली उचल द्यावी. मागील हंगामातील तुटलेल्या उसाला प्रतिटन एफआरपी अधिक २०० रुपये प्रमाणे अंतिम बिल द्यावे. केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत ३१ रुपयांवरून ४५ रुपये करावी, इथेनॅाल खरेदी दरामध्ये प्रति लिटर पाच रुपयांनी वाढ करावी. यंदाची पहिली उचल १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करावी, अन्यथा ११ नोव्हेंबरनंतर आंदोलनाशिवाय पर्यायच राहणार नाही.- राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.यंदाच्या हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला कारखान्यांनी पाच हजार रुपये एफआरपी तत्काळ द्यावी. त्याचबरोबर केंद्र सरकारने एफआरपीचे तुकडे करू नये आणि एफआरपीतून तोडणी वाहतूक वजा करू नये. - पंजाबराव पाटील, संस्थापक, बळीराजा शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.