Shaktipeeth Survey: कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील एरंडोळ येथे रविवारी (ता. २२) शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेली मोजणी शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीने विरोध करत रोखली. प्रशासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपग्रहाच्या आधारे मॅपिंग केली जात होती. या वेळी प्रशासन व आंदोलकांत शाब्दिक चकमक उडाली. .आंदोलनासाठी आलेल्या २० जणांना अटक करून आजरा पोलिस ठाण्यात आणले. चंदगड तालुक्यातील इनाम म्हाळुंगेनंतर आजरा तालुक्यातील एरंडोळ, खानापूर आणि रायवाडा येथे मोनार्क कंपनीतर्फे शक्तिपीठ महामार्गासाठी मॅपिंग सुरू होते. प्रांताधिकारी हरेश सूळ, तहसीलदार समीर माने, गडहिंग्लज विभागाचे पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील, आजऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, प्रशासनातील अधिकारी व पोलिस फाैज फाट्यासह दाखल झाले..Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र विरोध; शेळोलीत अधिकाऱ्यांना रोखले, शेतकरी पोलिसांच्या ताब्यात.दरम्यान, संपत देसाई, जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पाटील, उपतालुका प्रमुख युवराज पोवार मोजणी स्थळावर कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली व मॅपिंगला विरोध दर्शवला..Shaktipeeth Highway Protest: '...तर झोडपून काढू'; शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला नांदेडमधील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, अधिकारी माघारी परतले.‘पालकमंत्र्यांबरोबर बैठक घ्यावी, त्यानंतर मोजणीबाबत निर्णय घ्यावा, असे जिल्हा परिषद सदस्य देसाई यांनी सांगितले. पाटील यांनी मोजणीच करू नका, असा पवित्रा घेतला. पोवार म्हणाले, की पाटबंधारे प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी जमिनी दिल्या असताना त्याही महामार्गासाठी काढून घेतल्या जात आहेत..प्रकल्पग्रस्तांनी जायचे कुठे? असा सवाल केला. पोलिसांनी सुधीर देसाई, संपत देसाई, संभाजी पाटील, युवराज पोवार, संजय येसादे, प्रकाश मोरस्कर, भीमराव माधव, युवराज जाधव, नामदेव फगरे, दशरथ घुरे, विश्वास जाधव, शंकर पाटील, दिनेश कांबळे, सुधीर सुपल आदी सहाजणांना अटक केली. सम्राट मोरे आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.