Farmers Demand: प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज (ता. १८) पंढरपूर येथे ‘सद्बुद्धी दिंडी यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकरी विठुरायाच्या दारी न्याय मागण्यासाठी एकत्र येणार आहेत. यात्रेला आज सकाळी ११ वाजता पंढरपूरजवळील ऐतिहासिक वाखरी पालखी स्थळ येथून प्रारंभ होणार आहे..पंढरपूर येथील राज पॅलेस, इसबावी येथे सर्व बाधित शेतकऱ्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर वाखरी ते विठ्ठल मंदिर अशी हजारो शेतकऱ्यांची पायी ‘सद्बुद्धी दिंडी यात्रा’ काढण्यात येणार आहे..Shaktipeeth Highway Issue: आषाढीला पंढरपुरात ‘सद्बुद्धी दिंडी’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक.शेतकरी संघर्ष समितीचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी आणि अन्य नेत्यांनी स्पष्ट केले, की शेतकऱ्यांची सोन्यासारखी सुपीक जमीन, पिढ्यान् पिढ्यांची घरे आणि बागायती क्षेत्र हिरावून घेण्याचा अधिकार सरकारला नाही..Shaktipeeth Highway Protest: 'बा विठ्ठला...त्यांना शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी दे!', पंढरपुरात 'सद्बुद्धी दिंडी'ची तयारी .मुख्यमंत्र्यांना हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची सुबुद्धी विठ्ठलाने द्यावी, हीच आमची सामूहिक प्रार्थना असेल. पंढरपूर येथील या ऐतिहासिक ‘सद्बुद्धी दिंडी’त महाविकास आघाडीसह विविध पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत..या दिंडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे गटनेते सतेज (बंटी) पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार कैलास पाटील, कॉम्रेड गिरीश फोंडे यांच्यासह सर्व बाधित जिल्ह्यांतील विविध पक्षांचे खासदार व आमदार प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.