Kolhapur Farmers Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात मंगळवारी (दि. ९ जून) शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. 'एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द', अशा घोषणा देऊन शेतकऱ्यांनी कोल्हापूर शहर दणाणून सोडले. 'रक्ताचे पाट वाहतील, पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही' असा आक्रमक पवित्रा घेत कोल्हापुरात शेतकरी रस्त्यावर उतरले. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. .या मोर्चात खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर येथील शेतकऱ्यांची या मोर्चात उपस्थिती होती. .Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या सर्व्हेक्षणाला विरोध, माळशिरस तालुक्यातील शेतकरी आक्रमक.'गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा,' अशी मागणी मोर्चातील शेतकऱ्यांची केली. ''मोबदला पिशवीत भरायचा काय?, शेतीच पाहिजे. पैसे नकोत, मुलांना नोकऱ्या नाहीत, खायचं काय?'', असा संतप्त सवाल एका महिला शेतकऱ्याने व्यक्त केला. आम्हाला मोबदला नको, आमची जमीन आम्ही देणार नाही. आमचं शेतभात सगळं जातंय, आम्ही काय खायचं?, अशा संतप्त प्रतिक्रियाही महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. .Shaktipeeth Highway Protest: 'शक्तिपीठ महामार्ग रद्द करा', माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, सर्व्हेक्षणास तीव्र विरोध.मोर्चा निघू नये म्हणून शासनाची दडपशाही- सतेज पाटील गरज नसलेला शक्तिपीठ रद्द व्हावा, ही आमची भूमिका आहे. हा मोर्चा निघू नये, यासाठी शासनाची दडपशाही चालली आहे. सांगली, सोलापूरमध्ये शेतजमिनीची मोजणी सुरु आहे. शेतकरी इकडे मोर्चाला आल्यानंतर जमिनीची मोजणी का करताय? हिंमत असेल तर शेतकरी असताना मोजणी करा, मग शेतकरी दाखवतील की मोजणीला आलेल्या लोकांचे काय करायचे? असा इशारा सतेज पाटील यांनी दिला. केवळ ५० हजार कोटी रुपयांच्या लाभापोटी हा रस्ता लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे..कोल्हापूर जिल्ह्यातील ७३ गावांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. यात मोठ्या प्रमाणात बागायती जमीन जाणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. हा महामार्ग रद्द करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.