Shaktipeeth Mahamarg Opposition: शक्तिपीठ महामार्गासाठी नऊ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रस्तावित जमीन मोजणीला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत मोजणीला कोणत्याही परिस्थितीत विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला..शेट्टी यांनी शेतकऱ्यांना आक्रमक आवाहन करत, अधिकारी जबरदस्तीने शिवारात आले तर नांगराच्या फाळाला धार लावून मायभूमीचे रक्षण करण्याची भूमिका मांडली..Shaktipeeth Highway Protest: शेतकऱ्यांनो नांगराच्या फाळाला धार लावून ठेवा, शक्तिपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी आक्रमक.या वेळी शेतकऱ्यांनी ‘‘शिवारात रक्ताचे पाट वाहतील, पण एक इंचही जमीन देणार नाही,’’ असा निर्धार व्यक्त केला..Shaktipeeth Expressway : ‘शक्तिपीठ’च्या मोजणीला विरोध.३ सप्टेंबरला प्रत्येक गावात मोजणीच्या शासकीय आदेशाची होळी करण्यात येणार आहे. ७ सप्टेंबरला शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आदेशाचा निषेध करतील. ९ सप्टेंबरला मोजणीच्या दिवशी गावबंदी व शिवारबंदी करून अधिकाऱ्यांना विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकरीही या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार आहेत..बैठकीस गिरीष फोंडे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, कृष्णात डी. पाटील, नामदेव यादव, भगवान पाटील, कृष्णात साबळे, अमित नाळे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.