Shaktipeeth Mahamarg Protest: हिंगोलीत शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. येथे संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा मार्ग रोखून धरला. नांदेड नाका परिसरात शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना बॅरिकेट्स लावून रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण तयार झाले..मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री झिरवाळ ध्वजारोहण करण्यासाठी येणार असल्याने त्याआधी काही वेळापूर्वी शेतकऱ्यांनी जवळच्या रस्त्यावर ठिय्या दिला. शक्तिपीठ महामार्गाबाबत पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेतली नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री झिरवळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली..Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’विरोधात साबळेवाडी, शिंदेवाडी, खुपिरेत शेतकरी एकवटले.'आम्ही पालकमंत्र्यांना भाकरी देणार होतो'आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा आनंदोत्सव आमच्या लेकराबाळांसोबत साजरा करायचा आहे. त्यासाठी प्रतिकात्मक रुपात ज्या शेतात आम्ही भाकरी खाल्या; त्या भाकरी घेऊन आम्ही आलो आहे. आम्ही गांधीगिरी म्हणून पालकमंत्र्यांना भाकरी देणार होतो. त्यांच्याकडून आम्ही झेंड्याच्या साक्षीने शब्द घेणार होतो की आता तरी तुम्ही लेखी आदेश काढायला हवा आणि मोजणी बंद करायला हवी, अशी मागणी एका शेतकऱ्याने केली..Shaktipeeth Highway Protest: 'जमीन मोजणी कराल, तर दांडक्यानं समाचार घेणार'; शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक.शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. यापूर्वी १ मे आणि १५ ऑगस्टच्या दिवशी आम्ही पालकमंत्र्यांना भेटायला आलो होतो. त्यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले होते की जोपर्यंत आमदार, खासदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसोबत बोलत नाही तोपर्यंत मोजणी होणार नाही, असे आम्हाला आश्वासित केले होते. पण पोलिसांच्या फौजफाटा घेऊन मोजण्या होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..'आमची जमीन आम्ही सोडणार नाही'आमची जमीन आम्ही सोडणार नाही. लेकरांना नोकऱ्या नाहीत. काय करावे आम्ही? असा संतप्त सवाल एका महिला शेतकऱ्याने केला. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाशी संदर्भात समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्याचे आश्वासन झिरवाळ यांनी दिले होते. त्यांनी ते पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. .मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हिंगोली येथे पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी यावेळी हुतात्म्यांना अभिवादन केले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.