शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलला सोलापूरपासून एक वेगळी नवीन अलाइनमेंट तयारहा मार्ग सोलापूर, सांगली, चंदगड असा असेलपंढरपूर जवळून हा मार्ग असेल, त्यासाठी संपादन सुरु करतोयमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती.Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज रविवारी (दि. १४) विधानसभेत (Maharashtra Winter Session Nagpur 2025) दिली. आता यासाठी आम्ही सोलापूरपासून एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे. हा मार्ग सोलापूर, सांगली, चंदगड असा जाईल, असे ते म्हणाले..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी शक्तिपीठबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, ''संरेखन (अलाइनमेंट) फायनला केली होती; ती लोकांनी आमच्या लक्षात आणून दिली. सोलापूरपासून केलेली आपली अलाइनमेंट राष्ट्रीय महामार्गाला संमातर जात होती. आता सोलापूरपासून एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे. ती आता सोलापूर, सांगलीतून चंदगड अशी असेल.'' .Shetkari Karjmafi: १ जुलैपर्यंत कर्जमाफी योजनेची घोषणा करु, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती.जयंत पाटील यांना उद्देशून फडणवीस यांनी सांगितले की, जयंतराव शक्तिपीठ महामार्गातून सुटले होते. आता तुमच्या आम्ही जवळ आणला. मी दाव्याने सांगतो की जयंतराव पत्र देतील की हा महामार्ग करा, एवढा फायदा त्याचा त्यांच्या मतदारसंघाला होणार आहे. .पंढरपूर जवळून हा मार्ग असेल. त्यासाठी संपादन सुरु करतोय. चंदगडमध्ये मोर्चा नेऊन लोकांनी महामार्ग न्यावा, असे म्हटले आहे. म्हणून काही अडचण नाही. ज्यांच्याकडून अलाइनमेंट काढली ते लोक आमच्याकडे आले आहेत. ते आता म्हणतात की अलाइनमेंट काढू नका. तुमच्या विरोधामुळे नाही तर अधिक व्यवहार्य मार्ग मिळाला, असेही फडणवीस म्हणाले..Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी?; राजू शेट्टींचा सरकारला सवाल.मुंबई- कल्याण, लातूर हैदराबाद असा नवीन 'जनकल्याण द्रुतगती महामार्ग' तयार करत असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. मुंबईहून हैदराबादला जाणार मार्ग आहे, तो म्हणजे समुद्धी महामार्ग. यावरुन जालना, नांदेड, निजामाबाद असे गेलो तर अंतर ७१७ किमी आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद गेलो तर अंतर ७०७ किमी आहे. नवीन महामार्गामुळे अंतर ५९० किमी होईल. सगळ्यात फायदा म्हणजे लातूरपासून मुंबईचे अंतर साडेचार तासांचे होईल, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे..गतीशक्तीचा वापर करून वन जमीन टाळून हे प्रकल्प आखले जात आहेत. यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या दुष्काळी भागाचे चित्र बदलून जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.