Latur News: तीन दिवसांपासून प्रशासनाने हाती घेतलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीच्या कामाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. मोरवड (ता. रेणापूर) येथे मोजणीला विरोध करत एका शेतकऱ्याने झाडावर चढून आत्महत्येची धमकी दिली, तर कवठा (ता. औसा) येथे एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विरोधाची वाढती धग पाहून चाडगाव (ता. रेणापूर) येथे शुक्रवारी (ता. १३) अधिकारी मोजणीसाठी फिरकलेच नाहीत. .निवडणुकांच्या कामांतून बाहेर येताच प्रशासनाने शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे काम हाती घेत शेतकऱ्यांना मोजणीसाठी नोटिसा दिल्या. नोटिसा आल्यानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येत मोजणीला विरोध सुरू केला. त्याची सुरुवात मोरवड येथून १० फेब्रुवारीपासून झाली..Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांत संभ्रमाचे मोहोळ.मोजणीला विरोध करत येथील एका शेतकऱ्याने झाडावर चढून आत्महत्येची धमकी दिली. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे मोरवड येथे पोलिस बंदोबस्त असतानाही महसूल, भूमी अभिलेख व अन्य विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोजणी करता आली नाही..दुसऱ्या दिवशी बुधवारी रामेश्वर येथेही शेतकऱ्यांच्या विरोधापुढे प्रशासन हतबल झाले. गुरुवारी (ता. १३) कवठा येथेही शेतकऱ्यांच्या मोठ्या विरोधाचा सामना मोजणी पथकाला करावा लागला. एका शेतकऱ्याने मोजणीला विरोध करत विष प्राशन केले व आत्महत्येचा प्रयत्न केला. अशा प्रकारे, तीन दिवसांत शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीच्या निमित्ताने प्रशासन व शेतकऱ्यांतील संघर्ष शिगेला गेला आहे..Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’ची लांबी वाढण्याची शक्यता.यातच चाडगाव येथील शेतकऱ्यांना शुक्रवारी सकाळी ९ वाजता मोजणीसाठी नोटिसा देण्यात आल्या. चाडगाव व परिसरातील शेतकरी मोजणीच्या विरोधासाठी जमले. परंतु मोजणीसाठी एकही अधिकारी किंवा कर्मचारी तिथे फिरकला नाही. दुपारी साडेबारापर्यंत प्रतीक्षा करून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात काहीही उत्तर दिले नाही..अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी येण्याबाबत निश्चित सांगितले नाही किंवा लेखी कळविण्याची उत्सुकताही दाखविली नाही. शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर होत असलेली जबरदस्ती व दडपशाही तत्काळ थांबवावी.ॲड. गजेंद्र येळकर, जिल्हाध्यक्ष, शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.