Kolhapur News: कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद करनूर (ता. कागल) येथील प्रगतीशील शेतकरी अमोल कुमार खोत यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (व्हीएसआय) यांच्यामार्फत दिला जाणारा ‘ऊस भूषण पुरस्कार’ जाहीर झाला. २०२४-२५ गळीत हंगामासाठी, दक्षिण विभागातील पूर्व हंगाम लागण गटात सर्वाधिक ऊस उत्पादन घेत त्यांनी या पुरस्काराला गवसणी घातली. .शाहू कारखान्याकडे गळितास आलेल्या को-८६०३२ या ऊस जातीचे हेक्टरी २८१.६३ मे. टन इतके विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले..Sugarcane Award : अनिता दळवी ठरल्या ‘ऊसभूषण’च्या मानकरी.शाहू साखर कारखान्याचे विद्यमान ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांना राजारामबापू पाटील कारखान्याकडील २०२४-२०२५ या सेवा कालावधीसाठी उत्कृष्ट ऊस विकास अधिकारी हा पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी शेतकरी अमोल खोत यांच्यासह ऊस विकास अधिकारी पाटील यांचा सत्कार केला..Sugarcane Award : सर्वोत्कृष्ट ऊस विकास संवर्धनासाठी दत्त कारखान्यास प्रथम पुरस्कार.कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी मंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील, .सर्व संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांचे प्रोत्साहन त्यांना लाभले. शेती अधिकारी दिलीप जाधव व शेती विभागाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.