Thane News: शहापूर नगरपंचायत क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, १९८३ मधील जुनी पाणीपुरवठा योजना आता कालबाह्य ठरली आहे. नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळण्यासाठी 'भातसा नदी' या स्रोतावर आधारित नवी सक्षम पाणीपुरवठा योजना तातडीने मंजूर करावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे..आमदार डावखरे यांनी निवेदनात नमूद केले की, शहापूर नगरपंचायतीची स्थापना झाल्यापासून शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. .New Farmer Scheme : पीक विमा, नैसर्गिक आपत्तीच्या मदतीतून उरलेल्या निधीवर योजनेची मदार.सध्या कार्यान्वित असलेली योजना चार दशकांपूर्वीची असल्याने ती आजच्या वाढत्या वसाहतींना पाणी पुरवण्यास असमर्थ ठरत आहे. २०४४ पर्यंतची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन दीर्घकालीन नियोजन करणे आता अनिवार्य झाले आहे..Water Supply Scheme Issue: पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले.नगरपंचायतीने यापूर्वीच आवश्यक ठराव करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. काही खासगी प्रकल्पांचे आरक्षण रद्द झाल्यामुळे उपलब्ध झालेले २.५७ दलघमी प्रति वर्ष इतके पाणी शहापूर नगरपंचायतीला देण्याचा प्रस्ताव सध्या मंत्रालयात प्रलंबित आहे..भातसा नदीवर आधारित स्वतंत्र योजना कार्यान्वित झाल्यास शहापूरकरांना पुरेसे आणि शुद्ध पाणी मिळेल. तसेच सक्षम पाणीपुरवठा व्यवस्थेमुळे शहराच्या नियोजित नागरी विकासाला वेग येईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.