Nanded News: नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार, ४९८ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तसेच अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे १९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. .पावसामुळे गावोगावी घरांची पडझड झाली आहे. एकूण २०३२ घरांचे नुकसान झाल्याची नोंद झाल्यामुळे शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. या आपत्तीत हजारो जनावरे वाहून गेली आहेत. त्याची नोंद नसल्याने पशुपालक हतबल झाली आहेत..Nanded Flood Rescue : पुरात अडकलेल्या ६६ नागरिकांना काढले बाहेर .जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून एक हजार ५३६ गावांतील सात लाख ९ हजार ७६६ शेतकरी बाधित झाले. या काळात शेतकऱ्यांच्या सहा लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. या आपत्तीत १९ नागरिकांचा बळी गेला आहे..मोठी दुधाळ जनावरे, लहान दुधाळ जनावरे, ओढकाम करणारी मोठी व ओठकाम करणारी लहान जनावरे अशा एकूण ४९८ जनावरांचा समावेश आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या १४३ पशुपालकांना ३८.७८ लाखांची मदत देण्यात आली आहे. तर अद्याप ३५५ प्रकरण प्रलंबित आहेत..Nanded Flood Rescue : पुरात अडकलेल्या ६६ नागरिकांना काढले बाहेर .जिल्ह्यात झालेल्या या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी, जनावर पालक व सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत. तातडीने मदतकार्य राबविण्याची गरज आहे. प्रशासनाकडून प्राथमिक मदत सुरू करण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतुदीची अपेक्षा व्यक्त होत.वाहून गेलेल्या जनावरांची नोंदच नाहीअतिवृष्टीमुळे पुर येऊन जिल्ह्यातील अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. ही जनावरे सापडल्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून पंचनामा करण्यात आला. यानंतर संबंधित पशुपालकांना भरपाई देण्याचे काम हाती घेण्यात आले..परंतु जिल्ह्याच्या अनेक भागांत पुरामध्ये हजारो जनावरे वाहून गेली आहेत. त्याचा थांगपत्ताही लागला नाही. अशा जनावरांची माहिती पशुपालकांनी प्रशासनाला देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.