Solapur News : दोन दिवसांपूर्वी सीना नदीला पूर आला आणि नदी काठावरील गावांमध्ये पाणी शिरले. पुरात सापडलेले लोक अक्षरशः जिवाच्या आकांताने ओरडून, फोन करून मदत मागत होते. लोकांसमोर शेळ्या-मेंढ्या वाहून चालल्या होत्या. .स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक धडपडत होते. मात्र या पुरात आपत्ती व्यवस्थापन समिती कुचकामी ठरली असल्याचा आरोप होत आहे. सहकार्य मिळाले नसल्याचे पीडितांकडून सांगण्यात आले आहे. भविष्यात तरी करमाळा तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती जागरूक राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..सीना नदीच्या पुरामुळे शेतीचे, पिकांचे, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. निलज, खडकी येथील सूळवस्ती, खरातवस्ती, संगोबा परिसरातील नरूटेवस्ती, बालेवाडी येथील नलवडेवस्ती पाण्याखाली गेली. .Crop Damage Compensation : पंचनाम्याच्या निकषांमुळे भरपाई मिळण्यास अडचणी.अशा प्रसंगी लोकांना मदत मिळावी, म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन समिती जिल्हास्तर, तालुका स्तरावरची अस्तित्वात असते. मात्र करमाळा तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन समितीने लोकांची समजूत काढण्यापलीकडे प्रत्यक्ष कोणतीही मदत मिळाली नसल्याचे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अॅड. शशिकांत नरोटे यांनी सांगितले आहे..Rain Crop Damage : दिग्रस तालुक्यात संततधार पावसामुळे पिकांना फुटले कोंब .शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना किमान पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीने काम करणे गरजेचे होते. निलज (ता. करमाळा) हे गाव पूर्णपणे पाण्यात होते. पाणी शिरल्याने येथील लोकांना रातोरात गावातून बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीने प्रयत्न करणे गरजेचे होते..सीना नदीला पूर आला त्याचदिवशी रात्री दोन वाजेपर्यंत मी संगोबा व परिसरात उपस्थित होते. लोकांना योग्य त्या सूचना देण्याचे काम केले. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास लोकांना लवकर मदत उपलब्ध होण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.- शिल्पा ठोकडे, तहसीलदार, करमाळा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.