Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणसंग्रामाचे बिगुल वाजले असून, रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ आणि आठ पंचायत समित्यांच्या ११० अशा एकूण १६५ जागांसाठी अर्ज विक्रीच्या पहिल्या दोन दिवसांतच तब्बल एक हजार ७५ इच्छुकांनी दोन हजार ३१५ अर्ज नेले आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत सातपट अधिक अर्ज विक्री झाल्याने यंदाचा निवडणूक ज्वर जिल्ह्याचा राजकीय पारा वाढविणारा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे..राज्यात आणि जिल्ह्यात झालेली राजकीय पक्षांची फाटाफूट यंदाच्या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य ठरत आहे. पक्षांची संख्या वाढल्याने आणि नेत्यांची फळी विस्तारल्याने कार्यकर्त्यांना उमेदवारीच्या संधी अधिक दिसत आहेत. यामुळेच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांची मांदियाळी प्रत्येक गट आणि गणात पाहायला मिळत आहे..Local Body Elections: युती-आघाडीवर अजूनही सस्पेन्स.दोन दिवसांतील आकडेवारी काय सांगतेशुक्रवारी आणि शनिवारी अर्ज घेण्यासाठी केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. पहिल्या दिवशी ५२६ जणांनी एक हजार २२२ अर्ज नेले, तर दुसऱ्या दिवशी ५४९ जणांनी एक हजार ९३ अर्ज खरेदी केले. त्यापैकी शनिवारी (ता. १७) चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करून रणशिंग फुंकले..Local Body Elections: गावगाड्याच्या मिनी मंत्रालयाची रणधुमाळी.फाटाफुटीमुळे कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या१६५ जागांसाठी अर्जांचा आलेला पूर हे स्पष्ट करतो, की राजकीय फाटाफुटीमुळे कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या असून, प्रत्येक गट आणि गणात बहुकोणीय लढती होण्याची शक्यता आहे. बंडखोरी थोपविणे हे सर्वच पक्षांसमोर मोठे आव्हान आहे..वर्चस्व टिकविण्यासाठी रंगणार डाव-प्रतिडावराज्यात झालेल्या मोठ्या राजकीय फेरबदलांनंतर जिल्ह्यातही महायुती आणि महाविकास आघाडीअंतर्गत असलेल्या पक्षांमध्ये जागावाटपावरून आणि वर्चस्वावरून मोठी रस्सीखेच सुरू आहे. आपले वर्चस्व कसे टिकून राहील, यासाठी डाव-प्रतिडाव टाकण्याची रणनीती आखली जाऊ लागली आहे. विशेषतः खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, तानाजी सावंत आणि कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, बसवराज पाटील, राहुल मोटे आदी नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.