Nanded News: रेशीम शेतीत कौशल्याला किंमत आहे. तुती उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम उत्पादन घेताना कौशल्य आत्मसात होते. यामुळे शेतकरी इतर कोणतेही पीक घेताना कुशल बनतो. यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन परभणी येथील केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ अशोक जाधव यांनी केले..जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने जोमेगाव (ता. लोहा) येथील विनोद शिंदे यांच्या शेतावर रेशीम कीटक संगोपन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी श्री. जाधव बोलत होते. या वेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. बी. नरवाडे, क्षेत्र सहायक शुभांगी साबळे, क्षेत्र सहायक कांचन जाधव, तांत्रिक सहायक अभय कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील रेशीम शेती करणारे शेतकरी उपस्थित होते. .Sericulture Farming: काटेकोर व्यवस्थापनातून रोखला उझी माशीचा प्रादुर्भाव.श्री. जाधव म्हणाले, ‘‘बदलत्या वातावरणाच्या काळात रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. प्रारंभी गुंतवणूक होत असली तरी शासनाचे अनुदान, कोष उत्पादनातून फायदा होतो. शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सेंद्रिय पद्धतीने तुतीचे क्षेत्र वाढवावे..Sericulture Farming : एकेकाळी केली रोजंदारी रेशीम उद्योगातून घेतली भरारी.’’ तुतीवर येणारे कीड-रोग, माती परीक्षण, खत मात्रा, कीड व्यवस्थापन याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. श्री. नरवाडे यांनी शेतकऱ्यांना मनरेगा, सिल्क समग्र तसेच पोकरा योजनेतून तुती लागवड करावी, एकरी उत्पादन चांगले येण्यासाठी चांगल्या पाल्याचा वापर करावा, असे आवाहन केले. .या वेळी शेतकऱ्यांना तुती पाल्याच्या गुणवत्तेबद्दल प्रत्यक्ष शेतात माहिती देण्यात आली. रेशीम उत्पादक विठ्ठल शिंदे, हणमंत शिंदे, राजकुमार मोहिते (रा. किन्हाळा, ता. बिलोली) यांनी कोष उत्पादनातील अनुभव सांगितले. बालाजी शिंदे, दिंगबर शिंदे, दिंगबर किशनराव शिंदे, नागोराव शिंदे, गोपिराव शिंदे, राजाराम शिंदे, सुभाष शिंदे, विश्वास गव्हाणे, संदीप माळेगावे, अरुण शिंदे, सतीश माळेगावे, मल्हारी गायकवाड, परसराम कापसे आदी शेतकरी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.