Nanded News: शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेतीला प्राधान्य दिले तर निरंतर उत्पन्न मिळू शकते. रेशीम शेतीबाबत आवश्यक तांत्रिक कौशल्य आत्मसात करून प्रायोगिक तत्त्वावर शेती करावी. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले..जिल्हाधिकारी कार्यालयात महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत फिरत्या जनजागृती वाहनास सोमवारी (ता. ९) जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. या वेळी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी एन. एम. शशिकांत, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपजिल्हाधिकारी श्री. कोळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मनरेगा अमित राठोड, रेशीम अधिकारी पी. बी. नरवाडे, तांत्रिक अधिकारी कांचन जाधव, रेशीम शेती करणारे शेतकरी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते..IAS Kiran Patil: विकसित भारतासाठी ‘आत्मनिर्भर बुलडाणा’ घडवू : किरण पाटील.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, की जिल्ह्यातील हवामान रेशीम शेतीस अत्यंत अनुकूल आहे. लोहा तालुक्यातही रेशीम शेती यशस्वीपणे सुरू आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे ५०० ते ६०० रेशीम शेतकरी कार्यरत आहेत. पारंपारिक पिकांना पर्याय म्हणून रेशीम शेती अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. .IAS Varsha Ladda: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा लड्डा.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जालना व बीड येथे बाजारपेठ उपलब्ध असून, वन्यप्राण्यांचा त्रास नाही, रोगराईचे प्रमाण कमी आहे, निरंतर उत्पन्न मिळते तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) अनुदान मिळते. त्यामुळे कमी कालावधीत सातत्यपूर्ण उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धनगरवाडी येथील रेशीम शेतकऱ्यांशी संवाद साधून रेशीम शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत माहिती घेतली. .यामध्ये धनगरवाडी येथील शेतकरी बालाजी काळे यांनी अवघ्या एका महिन्यात एक लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सन २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांनी समूहाने मनरेगा, सिल्क समग्र-दोन व पोकरा योजनेअंतर्गत तसेच वैयक्तिक स्वरूपात नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. नोंदणीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.