डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलगSustainable Farming: निरोगी व सुपीक माती ही शाश्वत शेतीची मूलभूत गरज आहे. मातीचे आरोग्य चांगले असल्यास पिकांची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते. मातीचे आरोग्य उत्तम असल्यास योग्य भौतिक रचना, सेंद्रिय कर्बाचे पुरेसे प्रमाण, उपयुक्त सूक्ष्मजीवांची सक्रियता, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आणि पोषकद्रव्यांचा संतुलित पुरवठा उत्तमरीत्या होतो. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन होते आणि शाश्वत शेतीला बळकटी मिळते. मात्र रासायनिक खतांचा असंतुलित वापर, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, क्षारता आणि सेंद्रिय पदार्थांचे कमी होत जाणारे प्रमाण यामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे पीक लागवड नियोजन करताना माती परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे..परंपरागत पद्धतीमध्ये मातीचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठविले जातात. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता विविध प्रकारचे सेन्सर वापरून मातीचे आरोग्य शेतामध्येच जलद आणि अचूकपणे तपासणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे मातीच्या स्थितीची त्वरित माहिती मिळते आणि त्यानुसार योग्य व्यवस्थापन करता येते..Soil Testing: ‘माती परीक्षणामुळे रासायनिक खतांचा संतुलित वापर शक्य’.सेन्सर म्हणजे कायसेन्सर हे असे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे वातावरणातील किंवा भौतिक घटकांतील बदल ओळखून त्यांचे मोजमाप करते. मातीमध्ये बसवलेले सेन्सर आर्द्रता, तापमान, सामू, क्षारता, पोषकद्रव्ये आणि इतर घटकांची माहिती गोळा करतात.ही माहिती मोबाईल, संगणक किंवा क्लाउड प्रणालीवर पाठवली जाते. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), वायरलेस सेन्सर नेटवर्क आणि ड्रोन तंत्रज्ञान यांच्या मदतीने मातीचे आरोग्य अधिक प्रभावीपणे तपासले जात आहे..मृदा आरोग्य तपासण्यासाठी सेन्सरमातीचा सामू मोजणारे सेन्सरमातीचा सामू मोजणारे सेन्सर हे मातीची आम्लता किंवा क्षारता सांगणारे महत्त्वाचे उपकरण आहे. सामू हे ० ते १४ या श्रेणीत मोजला जातो. सामू ७ असल्यास मातीतटस्थ असते, ७ पेक्षा कमी असल्यास आम्लीय तर७ पेक्षा जास्त असल्यास क्षारीय असते.पिकांसाठी ६.५ ते ७.५ हा सामू सर्वाधिक अनुकूल असतो. कारण यामध्ये पोषकद्रव्यांची उपलब्धता, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता आणि वनस्पतींची वाढ अवलंबून असते. आधुनिक सामू सेन्सर मातीतील हायड्रोजन आयनांच्या प्रमाणावर आधारित मोजमाप करून त्वरित आणि अचूक माहिती देतो..Soil Testing: खतांची टंचाई असताना माती परीक्षण का महत्त्वाचे? मातीचा नमुना घेताना काय टाळावे?.फायदेमातीचा प्रकार समजतो. मातीतील समस्या समजते.योग्य पिकांची निवड करता येते.पोषकद्रव्यांची उपलब्धता वाढविण्यास मदत होते.खतांचा कार्यक्षम वापर करता येतो. अनावश्यक खर्च कमी होतो. आम्लीय किंवा क्षारीय मातीमुळे होणारे उत्पादनातील नुकसान टाळता येते.सूक्ष्मजीवांच्या कार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते.पिकांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता सुधारते.माती सुधारणा उपाययोजनांचे योग्य नियोजन करता येते..मृदा आर्द्रता सेन्सरमृदा आर्द्रता सेन्सर हे मातीतील उपलब्ध पाण्याचे किंवा ओलाव्याचे प्रमाण मोजणारे अत्याधुनिक उपकरण आहे.हे सेन्सर मातीमध्ये ७ सेंमी आणि १५ सेंमी खोलीवरबसविले जातात. ते सतत मातीतील आर्द्रतेची माहिती गोळा करून संगणक, मोबाइल अॅप किंवा स्वयंचलित सिंचन प्रणालीकडे पाठवतात. आधुनिक अचूक शेतीमध्ये मृदा आर्द्रता सेन्सर हे पाणी व्यवस्थापनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन मानले जाते..उपयोगसिंचनाचे योग्य वेळापत्रक आणि प्रमाण निश्चित करणे.ठिबक, तुषार किंवा इतर सिंचन पद्धतींचे कार्यक्षम नियोजन. पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये आवश्यक आर्द्रता राखणे.दुष्काळी किंवा मर्यादित पाणी उपलब्ध असलेल्या भागांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर.स्वयंचलित सिंचन प्रणालीशी जोडून आवश्यकतेनुसार सिंचन सुरू किंवा बंद करणे.मातीतील आर्द्रतेच्या नोंदींच्या आधारे योग्य निर्णय घेणे..फायदेआवश्यक तेव्हाच सिंचन केल्यामुळे २० ते ५० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होऊ शकते.अतिसिंचन आणि कमी सिंचन या दोन्ही समस्या टाळता येतात. पिकांवर पाण्याचा ताण येत नाही. त्यामुळे पीक वाढ आणि उत्पादन सुधारते.खतांचे पाण्याबरोबर होणारे नुकसान कमी होते..ऊर्जा, मजुरी आणि सिंचन खर्चात बचत होते.मुळांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते.पिकांचे उत्पादन, गुणवत्ता आणि संसाधन वापर कार्यक्षमता वाढते.- डॉ. समाधान सुरवसे, ९८६०८७७०४९- डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२७५८२१(वसंतदादा शुगर इन्टिट्यूट, मांजरी बु. जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.