ठळक मुद्दे जीएम मोहरीवरील स्थगिती उठवण्याची विनंतीजीएम पिकांसाठी स्पष्ट धोरणात्मक आराखडा सादर करण्याची सूचनाजगभरात जीएम पीक क्षेत्रात वाढ झाल्याचा दावा.GM Mustard : यंदाच्या मोहरी पीक पेरणीच्या हंगामापूर्वी, जनुकीय सुधारित अर्थात जीएम मोहरी पिकाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. एका वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या एका गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहून जीएम मोहरीवरील स्थगिती उठवण्याची विनंती केली आहे. त्यांनी केंद्र सरकारला देशाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रांसह जीएम पिकांसाठी स्पष्ट आणि ठोस धोरणात्मक आराखडा न्यायालयात सादर करण्याची सूचना केली आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस स्टॅंडर्डने दिले आहे. .या पत्रावर भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) माजी महासंचालक आणि कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे (DARE) सचिव डॉ. आर. एस. पारोदा, बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेचे माजी संचालक डॉ. जी. पद्मनाभन, भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी संचालक आणि आशिया-पॅसिफिक अन्न आणि कृषी संघटनेचे माजी सहाय्यक महासंचालक प्राध्यापक आर. बी. सिंह यांच्यासह इतर वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत..GM Mustard : जीएम मोहरी : संधी आणि धोके.जगातील विविध पीक परिस्थितीवर नजर टाकली तर, २०२४ मध्ये सुमारे २१० दशलक्ष हेक्टरवर जीएम पिके घेण्यात आली. चीन, केनिया आणि नायजेरियात अलिकडेच दिलेल्या मंजुरींमुळे जीएम पीक लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे, असे पत्रातून निदर्शनास आणून दिले आहे..भारताच्या पर्यावरण मंत्रालयाने ऑक्टोबर २०२२ मध्ये हायब्रिड बियाणांच्या उत्पादनासाठी जीएम मोहरीला पर्यावरणीयदृष्ट्या मान्यता दिली होती. ज्यात पहिल्या हायब्रिड डीएमएच-११ चा समावेश होता. त्यानंतर त्यावर आयसीएआरच्या ( ICAR) नेतृत्वाखाली अनेक चाचण्या आणि परागकण अभ्यास करण्यात आला. पण, ही प्रक्रिया अनेक कायदेशीर भोवऱ्यात सापडली आहे. यामुळे याला आणखी विलंब होताना दिसत असल्याते पत्रात पुढे म्हटले आहे..GM Mustard : जीएम मोहरी वाणावरुन वाद का सुरु झाला? | Agrowon | ॲग्रोवन.प्रतिकूल परिणाम नाही जीएम पिकाच्या सुरक्षेबाबत, शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की यासाठीचे जीन्स कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात अनेक दशकांपासून हायब्रिड रॅपसीड विकसित करण्यासाठी सुरक्षितपणे वापरले गेले आहे. याचा कोणत्याही प्रतिकूल परिणाम दिसून आलेला नाही. भारतामध्ये मोहरीवर केलेल्या सर्व जैवसुरक्षा चाचण्यांमध्येही कोणताही नकारात्मक प्रभाव दिसलेला नाही..‘...तर आणखी एक हंगाम वाया जाईल’२०२५ मधील ऑक्टोबरच्या मध्यातील पेरणीचा कालावधी चुकवल्यास शेतकऱ्यांकडून लागवडीसाठी महत्त्वाची असलेली आकडेवारी, हायब्रिड वाढ आणि त्याच्या व्यावसायिकरित्या लागवडीसाठी आणखी एक हंगाम वाया जाईल. २०२२ मध्ये जीएम मोहरी लागवडीसाठी मंजुरी मिळाल्यानंतर आधीच दोन महत्त्वाची वर्षे वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना भारतात विकसित केलेल्याचा तंत्रज्ञानाचा फायदा होणार नाही," असे पत्रात म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.