Pratap Hogade Death : ज्येष्ठ वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांचे निधन

Pratap Hogade : ज्येष्ठ वीजतज्ज्ञ व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे वय (७४) यांचे सोमवारी (ता. १८) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने इचलकरंजीत निधन झाले.
Pratap Hogade
Pratap HogadeAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : ज्येष्ठ वीजतज्ज्ञ व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे वय (७४) यांचे सोमवारी (ता. १८) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने इचलकरंजीत निधन झाले. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जात होते.

होगाडे यांनी वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आवाज उठवला. कृषिपंपाचा वीज वापर, वीज गळती, यंत्रमाग वीजदर सवलत, यावर सातत्याने विविध पातळ्यांवर आंदोलने करून संबंधित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

Pratap Hogade
Pratap Hogade : वीजतज्ञ प्रताप होगाडे यांचे हृदयविकाराने निधन

शेतकऱ्यांसाठी मुंबईच्या धर्तीवर वीज धोरण राबविण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. २००० पासून महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे ते अध्यक्ष होते. २०१५ मध्ये त्यांची राज्य शासनाच्या ‘कृषिपंप वीज वापर सत्यशोधन समिती’वर सदस्यपदी नियुक्ती झाली.

Pratap Hogade
Agricultural Pumps : कृषी पंपांचा खरा वीजवापर फक्त १५ टक्केच; मात्र वितरण कंपनी करतेय शेतकऱ्यांची फसवणूक : प्रताप होगाडे

महाराष्ट्रातील शेतकरी, यंत्रमागधारक, लघूउद्योजक, शेतमजूर, कामगार, छोटे घरगुती व व्यापारी वीजग्राहक अशा राज्यातील अंदाजे २ कोटींहून अधिक सर्वसामान्य वीजग्राहकांच्या हितासाठी व न्याय्य हक्कासाठी लढा दिला. संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी रस्त्यावरील आंदोलने केली.

वीज आयोगासमोर हजारोंच्या संख्येने हरकती देऊन न्यायालयीन लढाईही सातत्याने केली. यामुळे अनेक सकारात्मक निर्णय झाले. वीज वहन, वितरण गळती आकार, सिंगल फेजिंग योजना, कृषिपंप वीज बिलातील तफावत, अनुदानातील नेमकेपणा आदींसह कृषी औद्योगिक व घरगुती वीज वापरावर सातत्याने लिखाण, आंदोलन करून ग्राहकांसाठी लढा दिला. तसेच या बाबत ते ‘ॲग्रोवन’मध्ये नियमित लेखन करीत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com