शिवाजी काकडे जागतिक आरोग्य संघटनेने देखील एकविसाव्या शतकातील दहा जीवनकौशल्ये सांगितली आहे. त्यातील पहिले आणि महत्त्वाचे कौशल्य म्हणजे ‘स्व’ जाणीव हे आहे. मात्र आजच्या शिक्षणव्यवस्थेत याकडे दुर्लक्ष होत आहे. .Modern Education System and Self Growth: एक लग्नाळू तरुण होता. बऱ्याच दिवसांपासून त्याचे लग्न जुळत नव्हते. अशातच शहरात एका विवाह मंडळाने आपणास अनुरूप वधू मिळेल अशी जाहिरात दिली. जाहिरात वाचुन तो तरुण दिलेल्या पत्यावर पोहचला. त्या ठिकाणी एक भलीमोठी आणि सुंदर इमारत होती.इमारतीत प्रवेश केल्यावर तरुणाला दोन दरवाजे दिसतात. पहिल्या दरवाजावर लिहले होते तुमच्या वयानुरूप वधू आणि दुसऱ्या दरवाजावर लिहले होते तुमच्यापेक्षा अधिक वयाची वधू. तो तरुण पहिल्या दरवाजातून आत प्रवेश करतो.परत त्याला दोन दरवाजे दिसतात. पहिल्या दरवाजावर लिहले होते सुंदर वधू तर दुसऱ्या दरवाजावर लिहले होते साधारण दिसणारी वधू. तरुण पहिल्या दरवाजातून प्रवेश करतो मात्र तिथेही कुणी नसते..Agri Reforms: खत विक्री प्रणाली ‘अॅग्रीस्टॅक’ला जोडणार.परत त्याला दोन दरवाजे दिसतात. पहिल्या दरवाजावर चांगला स्वयंपाक करणारी वधू तर दुसऱ्या दरवाजावर स्वयंपाक न करणारी. तरुण पहिल्या दरवाजातून प्रवेश करतो. परत त्याला दोन दरवाजे दिसतात पहिल्या दरवाजावर लिहले होते सुंदर गाणे गाणारी तर दुसऱ्या दरवाजावर गाणे न गाता येणारी.तरुण पहिल्या दरवाजातून आत प्रवेश करतो. परत दोन दरवाजे दिसतात. पहिल्यावर लिहिले होते हुंडा देणारी वधू तर दुसऱ्यावर लिहिले होते हुंडा न देणारी. तरुण अत्यंत हुशारीने आणि व्यवहार कुशलतेने एक - एक दरवाजा पुढे चालला होता. साहजिकच त्याने पहिला दरवाजा निवडला. मात्र त्याला कुठेच वधू मिळाली नाही. शेवटी एक आरसा लावलेला होता. त्यावर लिहिले होते, ‘‘आपण अधिक गुणांचे इच्छुक आहात, आता वेळ आली आहे आपण आपला स्वतःचा चेहरा आरशात पाहण्याची.’’.व्यक्तीला स्वतःचा शोध घेण्यास समर्थ करणे हेच शिक्षणाचे खरे काम आहे. स्व शोधातूनच व्यक्तीचा आंतर - बाह्य विकास होतो हा विचार भारतीय ज्ञानपरंपरेत मांडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील एकविसाव्या शतकातील दहा जीवनकौशल्ये सांगितली आहे. त्यातील पहिले आणि महत्त्वाचे कौशल्य म्हणजे ‘स्व’ जाणीव. मात्र आजच्या शिक्षणव्यवस्थेत याकडे दुर्लक्ष होत आहे..APMC Reforms: ‘बाजार व्यवस्थेवर आता सत्ताधाऱ्यांचे नियंत्रण’ .शिक्षणाचे बाजारीकरणजागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने झालेल्या बदलांमुळे जग हे बाजारपेठ झाले आणि आपण सगळे ग्राहक. व्यक्ती आणि समाजजीवन वस्तू आणि अर्थकेंद्री झाले. काहीही आवश्यकता नसलेल्या अनेक गोष्टी बाजारपेठेने निर्माण करून जीवनावश्यक बनवल्या. या बदलांचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर देखील झाला. आपल्या मुलांना चांगला रोजगार मिळावा. नोकरी, पैसा आणि सुखी आयुष्य मिळावे असे प्रत्येक पालकाला वाटते. असे वाटणे चुकीचे देखील नाही. मात्र, मुलांना शिक्षण देत असताना मुलांच्या क्षमता, आवड, बलस्थाने, मर्यादा यांच्याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या डोक्यात माहिती भरवणारे शिक्षण देत असल्यामुळे मुलांच्या ''स्व'' - विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. पालक आणि शिक्षणव्यवस्था त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी पुरवतात मात्र मुलांना काय हवे याचा विचार होताना दिसत नाही..काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने नागपूर एम्स येथे आत्महत्या केली. राजगुरुनगर येथे खाजगी शिकवणी वर्गात दहावीच्या विद्यार्थ्याने वर्गमित्राचा गळा चिरून खून केला. एकट्या छत्रपती संभाजीनगरात आई रागवली, मोबाइल, गाडी दिली नाही म्हणून वर्षभरात १८२ मुलांनी घर सोडून पळ काढल्याची नोंद रेल्वे पोलिसांत झाली.मुले हुशार आहेत पण शहाणी आणि समजदार नाहीत. अनेक वर्तनसमस्या मुलांमध्ये दिसून येतात. राग, चिडचिड, आक्रस्तळेपणा, हिंसा, माझेच खरे आहे, दुसऱ्याच्या मताचा आदर न करणे, वस्तूसाठी हट्ट धरणे, भावनिक अस्थिरता, अविचारी आणि बेजबाबदार वर्तन या सर्व गोष्टीसाठी चुकीचे शिक्षण, पालकांच्या, समाजाच्या अपेक्षांचे ओझे, मुलांची आवड, क्षमता न बघता लादलेले परीक्षेचे, करिअरचे ओझे या गोष्टी कारणीभूत आहेत. आपण मुलांना बाह्य गोष्टीविषयी माहिती देतो मात्र मुलांना स्वतःच्या अंतरंगात डोकावून ''स्व'' चा शोध घ्यायला शिकवत नाही..Land Reform: बाराशे गावांतील ६० हजार गट नंबर होणार ‘डीम्ड एनए’.मानवी जीवनात भावनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भावनांशिवाय मानवीजीवन म्हणजे पशुजीवन होय. जगण्यातला आनंद भावनांमुळे मिळतो. वेगवेगळ्या भावना जीवनाला आधार असतात. सुख - दुःख, आशा - निराशा, भीती, क्रोध, चिंता, प्रेम, आपुलकी यामुळे मानवी जीवन वैविध्यपूर्ण बनते. विद्यार्थ्यांचे वा व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावत असते.व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा समतोल विकास हा मोठ्या प्रमाणावर त्याच्या भावनिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असतो. भावनिक बुद्धिमत्ता सदृढ असणाऱ्या व्यक्ती जीवनात यशस्वी व समाधानी असतात. अलीकडील काळात अनेक खाजगी बहुराष्ट्रीय कंपन्या नोकरीवर कामाला घेताना बुद्धिमत्तेबरोबर भावनिक बुद्धिमत्ता तपासून घेतात..स्वतःच्या भावना जाणून घेण्याबरोबरच इतरांच्या मतांचा आदर करणारे लोक अधिक प्रभावीपणे काम करतात. मात्र आजच्या शिक्षणव्यवस्थेत भावनांचा विचार न करता फक्त तार्किक क्षमता, वस्तुनिष्ठता, गणितीय बुद्धिमत्ता अशा क्षमतांचा विचार करून विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ठरविली जात आहे. यामुळे मुलांना स्वतःचा भावनांची जाणीव होत नाही, स्वतःचे अचूक स्व - परीक्षण करता येत नाही.भावनांचे आत्मनियमन न करता आल्यामुळे स्वतःचा आत्मघात करून घेतात. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण, नियमन न करता आल्यामुळे विघातक कृत्य करतात. मुलांचा भावनिक विकास होण्यासाठी मुलांना प्रेम, आपुलकी, सुसंवाद सुरक्षितता आणि विश्वास ह्या बाबी कुटुंब आणि शाळेत मिळायला हव्यात. आत्मशोधातूनच मुले सद्गुणी, विवेकी होऊन नैतिक व सामाजिक विकास घडून येतो..स्व - जाणीवस्वतःला जाणणे ही बुद्धिमत्तेची सुरुवात असते. व्यक्तीचा आत्मविकास घडवून आणणे हेच शिक्षणाचे मूलभूत कार्य आहे. मी कोण आहे? हा प्रश्नच विवेकाकडे घेऊन जातो. जे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘‘तुम्ही जगातील सर्व पदव्या मिळविल्यात तरी तुम्हाला जर स्वतःचे ज्ञान नसेल तर तुम्ही अत्यंत मूर्ख माणूस आहात! आपली सारी शिक्षणव्यवस्था केवळ माहितीकेंद्री आणि परीक्षाकेंद्री झाली आहे. मुलांना पहिलीपासून तीन - चार भाषा शिकवा, कृत्रिम बुद्धिमत्ता शिकवा, पहिलीपासून स्पर्धा परीक्षा घ्या. यामुळे मुलांचे बालपण हरवत आहे..समाजमाध्यमांमुळे तर सतत बाहेर काहीतरी शोधण्याची सवय मुलांना झाली. मात्र, स्वतःकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. स्वतःच्या भावना जाणणे, स्वतःची अभिरूची, क्षमता, बलस्थाने, मर्यादा यांची जाणीव, स्वतःच्या विघातक भावनांवर नियंत्रण ठेवणे, सुयोग्य पद्धतीने भावना हाताळणे याचे शिक्षण मुलांना देणे अत्यंत आवश्यक आहे. गुगल आपल्याला साऱ्या जगाचे रस्ते दाखवतो मात्र आपण स्वतः कुठे आहोत आणि आपल्याला नेमके कुठे जायचे आहे अर्थात ''स्व''चा शोध घेण्यास मदत करणारे जीवनशिक्षण मुलांना शाळेत मिळावे.७८८७५४५५५७(लेखक सहायक शिक्षक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.