Amravati News: कृषी निविष्ठा विक्रेत्यांना साथी ॲपवर प्रत्येक बियाणे पाकिटाच्या नोंदणीची सक्ती करण्यात आली आहे. ही बाब व्यावहारीकदृष्ट्या शक्य नसल्याने विक्रेत्यांच्या स्तरावर साथी ॲपवरील नोंदणीची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाने केली आहे. .उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार, प्रमाणित व चांगल्या दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना मिळावे याकरिता बियाणे उत्पादन साखळीचा तपशीत उपलब्ध होण्याच्या उद्देशाने साथी ॲपची अंमलबजावणी केली जात आहे..SATHI App : साथी ॲपमुळे कृषी निविष्ठा व्यवसायावर संकट.याकरिताचा हेतू चांगला असला तरी बियाणे उत्पादन साखळीत विक्रेत्यांचा सहभाग नसताना त्यांना प्रति पाकीट ॲपवरील नोंदणीचा आदेश मात्र अन्यायकारक आहे. कारण बियाणे विक्रीचा हंगाम काही महिन्यांपुरताच मर्यादित राहतो आणि बियाणे, निविष्ठांची साठवणूक गोदामात होते. शेतकरी बियाण्यांची उचल गोदामातून करतात तर बिल कृषी सेवा केंद्रात तयार होते. अशावेळी बियाणे टॅगवरील माहिती घेत ती बिलावर नोंदविणे अशक्यप्राय आहे..Sathi Portal : साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री व्यावहारिक नाही .आजच्या प्रचलीत नियमुासार बियाणे स्रोतबाबतची माहिती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध आहे. बियाण्याच्या सीलबंद पाकिटावर ते कायद्यातील कोणत्या तरतुदीनुसार तपासणी केले आहे, यासह उत्पादक ते मार्केटेड कंपनीचा पूर्ण पत्ताही त्यावर असतो. सीलबंद पाकिटावर क्युआर कोड येत आहेत..त्यामुळे ते पाकीट ओरीजनल किंवा डुप्लीकेट हे देखील ओळखता येते. स्टेटमेंट एक व दोनप्रमाणे प्रमाणित बियाणे रिलीज ऑर्डर व त्या लॉट नंबरला कोणत्या नंबरपासून कोणत्या नंबरपर्यंत किती टॅग देण्यात आले ही माहितीदेखील राहते. साथी ॲपच्या माध्यमातून याच बाबींची पुनरावृत्ती होणार असून नवीन काहीच साध्य होण्याची अपेक्षा नाही, असेही जिल्हाध्यक्ष मिलिंद इंगोले, तिवसा तालुकाध्यक्ष अमित गांधी यांनी नमूद केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.