शेतकरी नियोजन । पीक : हळद शेतकरी : कुंडलिक विठ्ठल पाटीलगाव : कोरेगाव, ता. वाळवा, जि. सांगलीएकूण शेती : ५ एकरहळद क्षेत्र : ९० गुंठे.कोरेगाव (ता. वाळवा) येथील कुंडलिक विठ्ठल पाटील हे मागील चार वर्षांपासून हळद लागवड करत आहेत. पाटील यांची पाच एकर शेती. त्यापैकी दरवर्षी एक एकरावर हळद लागवडीचे त्यांचे नियोजन असते. यंदा त्यांनी ९० गुंठे क्षेत्रावर हळदीची लागवड केली आहे. पीक व्यवस्थापनातील अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन हळद पीक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. श्री. पाटील यांनी बेणे निवड, बीजप्रक्रिया, अन्नद्रव्ये व्यवस्थापनासह, पीक संरक्षणावर भर देत हळद उत्पादनात सातत्य राखले आहे. सध्या हळद पीक आठ महिन्यांचे झाले असून पुढील महिन्यात काढणी सुरुवात होईल. पीक व्यवस्थापनासाठी कसबे डिग्रज येथील प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांच्याकडून वेळोवेळी हळद पिकाबाबत मार्गदर्शन घेत असल्याचे कुंडलिक पाटील सांगतात..Turmeric Farming: हळदीवरील कंदमाशी आणि कंदसड रोखण्यासाठी काय उपाय करावे?.दर्जेदार बेणे व प्रक्रियादरवर्षी हळदीची काढणी झाल्यानंतर त्यातील दर्जेदार मातृकंद बाजूला काढून ठेवले जातात. साधारण गोल आकाराचे मातृकंद निवडून त्याचा सावलीत ढीग करून ठेवला जातो. त्यानंतर लागवडीपूर्वी ते बेणे स्वच्छ केले जाते. त्यानंतर शिफारशीप्रमाणे जैविक आणि रासायनिक बेणे प्रक्रियेसाठी द्रावण तयार करून त्यात बेणे बुडवून नंतर लागवड केली जाते. लागवडीसाठी एकरी साधारणपणे १३ क्विंटल बेणे पुरेसे होते..पीक व्यवस्थापनातील बाबीहळद लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रात दरवर्षी फेरपालटीवर भर दिला जातो. साधारण दोन वर्षांनंतर ते क्षेत्र हळद लागवडीखाली असे नियोजन केले जाते. यंदाच्या लागवडीसाठी मागील दोन वर्षांपूर्वी हळदीखाली असलेल्या शेताची निवड केली आहे. मागील दोन वर्षे या शेतामध्ये हरभरा पिकाचे लागवड होती.लागवडीपूर्वी नांगरट करून जमीन भुसभुशीत केली जाते. त्यानंतर एकरी १० ट्रॉली प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत शेतात वापरले जाते. जातो. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढीस मदत होते..Turmeric Farming: हळदीवरील कंदमाशी आणि कंदसड रोखण्यासाठी तातडीची उपाययोजना.दरवर्षी साधारणपणे १५ मेनंतर लागवड केली जाते. लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राने साडेचार फुटांचे बेड तयार केले जातात. बेडच्या मधोमध ठिबकच्या लॅटरल अंधरून बेड भिजवून घेतले जातात. त्यानंतर दोन्ही बाजूला झिगझॅग पद्धतीने लागवड केली जाते. दोन गड्ड्यांत आठ ते नऊ इंच इतके अंतर राखले जाते.लागवडीनंतर साधारण दोन महिन्यांनंतर भरणी केली जाते. भरणी करतेवेळी निंबोळी पेंड, डीएपी, युरिया, म्युरेट पोटॅश, मिश्रखते, ह्युमिक ॲसिड, मॅग्नेशिअम सल्फेट, सिलिकॉन असा डोसचा दिला जातो. यामुळे पिकाच्या वाढीस मदत होते..ठिबकमधून १९ः१९, १२ः६१ः०, ० ५२ः३४ यांचा आलटून-पालटून आठ दिवसांतून एकदा असा वापर केला जातो.हळद लागवडीमध्ये संपूर्ण ठिबक सिंचन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या माध्यमातून विद्राव्य खतांच्या मात्रा देणे सोईचे होते. तसेच वाफसा स्थितीनुसार पिकास सिंचन करण्यास शक्य होते..पीक संरक्षणहळद पिकावर प्रामुख्याने करपा, भुरी, कंदकुज रोग तसेच कंदमाशी यांचा प्रादुर्भाव होतो. लागवडीनंतर आजपर्यंत नियमितपणे पिकाचे निरिक्षण केले जात आहे. त्यामुळे पिकामध्ये काही बदल आढळून आल्यास त्वरित उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. शेतात फिरल्यामुळे कीड-रोगाच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे प्रत्येक बारकावे लक्षात येतात. त्यानुसार निरीक्षण करून उपाययोजनांचा अवलंब केला जातो. आवश्यकतेनुसार तज्ज्ञांना पिकाचे फोटो पाठवून त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. त्यामुळे प्रभावी नियंत्रण मिळते..आगामी नियोजनसद्यःस्थितीत थंडीमुळे धुक्याची स्थिती होती. त्यामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक होती. त्यासाठी रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी घेतली आहे. हळद पीक सध्या आठ महिन्यांचे झाले आहे. पुढील महिन्यात हळदीची काढणी सुरू होईल. पीक काढणी नियोजनानुसार साधारण एक महिना अगोदर पिकाचे पाणी बंद केले जाते. त्यानुसार पीक अवस्था पाहून कार्यवाही केली जाईल.- कुंडलिक पाटील, ९९६०३७२३४४, (शब्दांकन ः अभिजित डाके).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.