डॉ. जितेंद्र कदम, डॉ. के साम्मि रेड्डीसध्या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी हळद लागवड क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत आहे. त्याचा पीक वाढीवर परिणाम होत आहे. हळदीमध्ये प्रामुख्याने वाढीच्या चार अवस्था असतात. त्यापैकी पहिली अवस्था म्हणजे उगवण, दुसरी अवस्था शाखीय वाढ, तिसरी अवस्था कंद सुटणे आणि चौथी अवस्था म्हणजे हळदीचे कंद भरणे. .सध्याच्या परिस्थितीमध्ये हळद वाढीच्या दुसऱ्या अवस्थेमधील शेवटच्या टप्प्यात आहे. या अवस्थेमध्ये शेतामध्ये पाणी साठवून राहिल्यास कंदकुज या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.पुराचे पाणी येऊन गेलेल्या पिकांमध्ये पाण्याचा जास्तीत जास्त निचरा होईल या पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे. तसेच पुराच्या पाण्यामध्ये हळद बुडली असल्यास पाणी ओसरताच पानावर पाण्याचा फवारणी करून चिखल धुऊन काढावा. .Turmeric Crop Management : हळद पीक पिवळे पडण्यामागील कारणे, उपाय.त्यानंतर फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा (मुख्य अन्नद्रव्ये) वापर करावा. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य दीड मिलि प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. त्यामध्ये सिलिकॉन घटक असलेला स्टिकर वापरावा.हळदीमध्ये पाणी साठल्यामुळे कंदकुजीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. यासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाचा वापर केल्यास फायदेशीर ठरते..जैविक पद्धतीने कंदकुजीचे नियंत्रण करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले सुपर बायोमिक्स किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बायोमिक्सचा वापर करावा. फवारणीद्वारे १० मिलि प्रति लिटर किंवा अळवणीद्वारे दोन लिटर प्रति एकर वापरावे. (ॲग्रेस्को शिफारस).Turmeric Crop Management : सद्य:स्थितीतील हळद पीक व्यवस्थापन.आद्रतेचे प्रमाण जास्त झाल्यामुळे तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे हळदीमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव अशा परिस्थितीमध्ये वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा मॅन्कोझेब अडीच ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पाण्यामध्ये बुडल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ पूर्णपणे थांबली जाते. पिकाची जोमदार वाढ पुन्हा सुरू होण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांचा वापर करावा..पावसाची उघडीप मिळाल्यास भरणी करताना लिंबोळी पेंड एकरी २५० किलो या प्रमाणात इतर खतांबरोबर वापरावी.कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास क्विनॉलफॉस दीड मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पिकामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रति एकरी ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश तसेच पाच किलो सिलिकॉनचा वापर करावा.- डॉ. जितेंद्र कदम ९८२२४४९७८९( राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.