Narayangaon News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) केंद्रामध्ये शनिवार (ता. २८) आणि रविवार (ता. १ मार्च) अशा दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे..टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या वतीने गेल्या २४ वर्षांपासून राबवला जाणारा हा उपक्रम सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी विनामूल्य खुला असेल. या प्रदर्शनाद्वारे खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक प्रगती जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे..District Science Exhibition: गणोरीत ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप .प्रदर्शनाचे उद्घाटन २८ फेब्रुवारीला सकाळी ९:३० वाजता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचा समारोप १ मार्चला दुपारी ३:३० वाजता कृषी महाविद्यालय पुणे येथील सह-अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांच्या उपस्थितीत होईल..Weather Science Exhibition: चक्रीवादळ म्हणजे काय, ते कसे तयार होते?विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी भारावले शास्त्रज्ञ.या वेळी प्रदर्शनात पुणे जिल्ह्यातील शाळा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचे २३० हून अधिक वैज्ञानिक प्रकल्प मांडले जातील, तसेच विविध नामवंत संस्थांचा सहभागही असेल. नागरिकांच्या सोईसाठी पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे..प्रदर्शनात काय पाहाल?जी.एम.आर.टी. दुर्बीण आणि रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीच्या इतिहासाची सविस्तर माहिती.तज्ज्ञ खगोल शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधून शंकांचे निरसन करण्याची संधी.तंत्रज्ञांनी तयार केलेले विज्ञानविषयक लघुपट आणि विविध वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण.बलून फॅसिलिटी हैदराबादच्या वतीने वैज्ञानिक बलूनचे उड्डाण आणि त्याचे प्रात्यक्षिक.विविध वैज्ञानिक पुस्तके, खेळणी आणि शालेय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे नावीन्यपूर्ण प्रकल्प..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.