Akola News: राज्यातील कृषी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. प्रामुख्याने खासगी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक हंगामाचा निधी अद्याप उपलब्ध झालेला नाही. एका बाजूला नवीन प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना जुन्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न मिळाल्याने महाविद्यालयांच्या कारभारावर गंडांतर आले आहे..कृषी शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाकडून फी परतावा, भत्ता आदी स्वरूपात आर्थिक साह्य मिळते. मात्र मागील वर्षाचा शिष्यवृत्तीचा निधी रखडल्यामुळे महाविद्यालयांना इतर प्रशासकीय खर्च भागविणे अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन-दोन महिने केले जात नसल्याची वस्तुस्थिती सांगितली जात आहे. या संदर्भात संस्थाचालकांनी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केला. पण अजून निधी वितरित न झाल्याने त्यांचे हाल बिकट झाले आहेत. विद्यार्थ्यांकडून फी वसुलीवर मर्यादा असल्याने संस्था आर्थिक संकटातून बाहेर पडू शकत नाहीत..Agriculture Education: कृषी शिक्षणातील संधी अन् फायदे .सोबत निधी रखडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी-सुविधांवर परिणाम होऊ लागला आहे. वसतिगृह, प्रयोगशाळा, प्रात्यक्षिके, संशोधन साहित्य आदी आवश्यक सुविधा पुरविण्याचा ताण संस्थांवर आला आहे. गरीब व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती शिक्षणासाठी मुख्य आधार असल्याने त्यांचीही चिंता वाढली आहे..Education Pressure: जबाबदार शिक्षण, बेजबाबदार अपेक्षा .शिष्यवृत्तीचा निधी तातडीने उपलब्ध न झाल्यास कृषी शिक्षणाचेच भवितव्य धोक्यात येईल, असे संस्थाचालक सांगत आहेत. ताण कमी करण्यासाठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क अबाधित राखण्यासाठी शासनाने त्वरेने निधी वितरित करावा, अशी मागणी होत आहे..सध्या या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. गुरुवारी (ता.२८) प्रवेशाची तिसरी फेरी सुरू होती. जागेवरील प्रवेश प्रक्रिया पुढील महिन्यात होणार आहे. विद्यार्थ्यांचा कलही कृषी शिक्षणाकडे वाढला आहे. चांगल्या महाविद्यालयात प्रवेशासाठी चढाओढ दिसून येत आहे..प्रलंबित शिष्यवृत्तीच्या मुद्यावर दर आठवड्याला आढावा घेत आहे. जसजसे अनुदान प्राप्त झाले ते प्राधान्यक्रमाने दिले जात आहे. आता २०२१-२२ पर्यंतची शिष्यवृत्ती पूर्ण करण्यात आलेली आहे. ज्यांची कागदपत्रे परिपूर्ण आहेत, बँक खाते जोडलेले आहे, अशांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाते. त्यामुळे निधी उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती काढली जात आहे.वर्षा लड्डा, महासंचालक, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.