Tree Cutting Controversy: सायडोंगर परिसरात टोरंट प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात मुंबईतील बादल गुडेकर या तरुणाने सुरू केलेल्या जलआंदोलनाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. २९ ऑक्टोबरपासून पेज नदीपात्रातील पाण्यात उतरून ते आंदोलन करत असून, सतत पाण्यात राहिल्याने त्यांच्या पायांची अवस्था गंभीर झाली आहे, मात्र आंदोलनकर्त्याच्या प्रकृतीची दखल घेण्यासाठी अद्याप प्रशासनातील कोणताही वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचला नसल्याची खंत व्यक्त होत आहे..मुंबईतील भांडुप येथील रहिवासी असलेले बादल गुडेकर २७ ऑक्टोबरला सायडोंगर परिसरात दाखल झाले. जंगलतोड रोखण्यासाठी त्यांनी सुरुवातीला आपल्या कारवर सह्यांची मोहीम राबवली. त्यानंतर त्यांनी पेज नदीपात्रात उतरून जलआंदोलन सुरू केले आहे. हातात डफली आणि काठी घेऊन ते जंगल वाचवण्याचा संदेश देत आहेत..Torrent Power Project: टोरंट प्रकल्पाला विरोध करणे कितपत योग्य?.मंदिरात विसावाआठ दिवस सतत पाण्यात राहिल्याने त्यांच्या पायांची अवस्था बिकट झाली आहे. पाली गावातील ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव त्यांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले तरुण-तरुणीही या आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी झाले आहेत. रात्री गावातील मंदिरात विसावा घेऊन दिवसभर पाण्यामध्ये राहून ते आंदोलन करत आहेत..Torrent Project Controversy: ‘टोरंट’ वादळ.गेल्या आठ दिवसांपासून पाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले, मात्र संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याने आंदोलनकर्त्यांची भेट किंवा त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात नागरिकांसह आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी पसरला आहे..प्रश्न राज्यभर चर्चेतएकीकडे सायडोंगरातील वृक्षतोडीचा प्रश्न राज्यभर चर्चेत असताना दुसरीकडे आठ दिवसांपासून नदीपात्रात बसलेल्या तरुणाच्या प्रकृतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत असून, बादल गुडेकर यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करून प्रशासनाने आंदोलनस्थळी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.